‘अन्न देशभक्ती’- नवा राष्ट्रवाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 06:19 PM2020-03-30T18:19:31+5:302020-03-30T18:20:05+5:30

फ्रान्समधल्या लोकांनी, शेतकर्‍यांनी आणि विशेषत: तिथल्या सुपरमार्केट्सनी, विक्रेत्यांनी यावर एक वेगळाच उपाय शोधून काढलाय! ‘अन्न देशभक्ती!’

'Food patriotism' - new nationalism, in the period of Corona.. | ‘अन्न देशभक्ती’- नवा राष्ट्रवाद!

‘अन्न देशभक्ती’- नवा राष्ट्रवाद!

Next
ठळक मुद्देआपल्या शेतातला आणि शेतातून काढलेला माल लोकांपर्यंत पोहोचवायचा कसा, हा प्रo्न अख्ख्या दुनियेतल्या शेतकर्‍यांना पडला आहे. 

- लोकमत

कसं वाचायचं या आपत्तीतून?  आपण आपलं संरक्षण करत असतानाच आपल्या देशालाही या आपत्तीतून कसं बाहेर काढायचं? संपूर्ण जगालाच पडलेला हा प्रo्न. 
या आणिबाणीच्या प्रसंगी सर्वाधिक नुकसान झालंय ते शेतकर्‍यांचं. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी लोकांना अल्पकाळ बाहेर पडता येत असलं तरी आपल्या शेतातला आणि शेतातून काढलेला माल लोकांपर्यंत पोहोचवायचा कसा, हा प्रo्न अख्ख्या दुनियेतल्या शेतकर्‍यांना पडला आहे. त्यात शेतमालाची परदेशी निर्यातही जवळपास बंद पडलेली. अशावेळी करायचं काय?
फ्रान्समधल्या लोकांनी, शेतकर्‍यांनी आणि विशेषत: तिथल्या सुपरमार्केट्सनी, विक्रेत्यांनी यावर एक वेगळाच उपाय शोधून काढलाय! ‘अन्न देशभक्ती!’
फ्रान्सच्या अनेक सुपरमार्केट्समध्ये परदेशी फळं, अन्नधान्यं आजही चिक्कार आहेत, पण हा सगळा परदेशी माल त्यांनी आपल्या रॅकमधून रिकामा केला आहे. देशातले शेतकरी उपाशी  मरत असतांना त्यांनी निर्णय घेतलाय, आता आम्ही आमच्या देशातलाच भाजीपाला, खाद्यपदार्थ आमच्या सुपरमार्केट्समधून विकू!
त्यामुळे फ्रान्समधल्या हजारो शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. मात्र त्याचवेळी फ्रान्समधल्या शेतीसाठी परदेशातून आलेल्या शेती कामगारांचा वाटाही प्रचंड मोठा, म्हणजे जवळपास सत्तर टक्के आहे. ‘या कामगारांची उपासमार आम्ही होऊ देणार नाही’, असं म्हणत त्यांची जबाबदारीही फ्रान्समधल्या शेतकर्‍यांनी उचलली आहे. 
कोरोनामुळे अनेक गोष्टी बदलल्या, पण ‘अन्न देशभक्ती!’सारखा नवा राष्ट्रवादही त्यानं जन्माला घातला!

Web Title: 'Food patriotism' - new nationalism, in the period of Corona..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.