बिझनेस चलविण्यासाठी वडिलांची विचित्र आयडिया, ग्राहकांना दिली अ‍ॅक्ट्रेस मुलीची ऑफर!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 09:33 AM2021-12-06T09:33:18+5:302021-12-06T09:36:08+5:30

अभिनेत्री म्हणाली, माझ्या आई-वडिलांना माझ्या करिअरचा अभिमान आहे. पण माझे वडील मात्र माझ्या प्रसिद्धीचा वेगळ्याच पद्धतीने फायदा करून घेत आहेत.

Father's offer to customers come to my bar and have chat with my actress daughter | बिझनेस चलविण्यासाठी वडिलांची विचित्र आयडिया, ग्राहकांना दिली अ‍ॅक्ट्रेस मुलीची ऑफर!

बिझनेस चलविण्यासाठी वडिलांची विचित्र आयडिया, ग्राहकांना दिली अ‍ॅक्ट्रेस मुलीची ऑफर!

Next

लंडन- ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी लोक काय करतील याचा नेम नाही, मात्र, हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री स्टेसी सोलोमन (Michelle Keegan) हिच्या वडिलांनी जे केले ते खरोखरच आश्चर्यकारक आहे. "जे लोक आपल्या 'बार'मध्ये येतील, ते लोक आपल्या अभिनेत्री मुलीसोबत समोरासमोर बोलू शकतील", अशी ऑफर तिच्या वडिलांनी लोकांना दिली आहे.  याचा खुलासा खुद्द स्टेसी सोलोमननेच केला आहे.

वडिलानी खरेदी केलाय नवा बार -
'डेली मेल'च्या वृत्तानुसार, अभिनेत्री स्टेसी सोलोमनने एका टीव्ही शोमध्ये सांगितल्यानुसार, तिचे वडील तिच्या प्रसिद्धीचा फायदा करवून घेत आहेत. ती म्हणाली, माझे वडील काही दिवसांपूर्वी टेनेराइफ येथे गेले होते आणि त्यांनी तेथे एक बार विकत घेतला आहे. आता त्यानी ग्राहकांना ऑफर दिली आहे, की जे लोक आपल्या बारमध्ये येतील, त्यांना प्रसिद्ध अभिनेत्री मिशेलसोबत म्हणजेच माझ्यासोबत 'फेसटाइम' अॅपद्वारे समोरासमोर बोलण्याची संधी मिळेल.

रोज येतायत पाच कॉल -
अभिनेत्री म्हणाली, माझ्या आई-वडिलांना माझ्या करिअरचा अभिमान आहे. पण माझे वडील मात्र माझ्या प्रसिद्धीचा वेगळ्याच पद्धतीने फायदा करून घेत आहेत. या ऑफरमुळे आपल्याला दररोज 'फेसटाइम'वर वेगवेगळ्या ग्राहकांकडून किमान पाच कॉल येत आहेत. त्यांना माझ्याशी बोलायचे आहे. कारण ऑफरनुसार ते माझ्या वडिलांच्या बारमध्ये जाऊन दारू पिले आहेत. ही खूप विचित्र ऑफर आहे, पण मी आनंदी आहे. कारण तो बार माझ्या वडिलांचे स्वप्न आहे आणि माझ्यामुळे त्यांचा व्यवसाय वाढत होत आहे.

Web Title: Father's offer to customers come to my bar and have chat with my actress daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.