अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या बालपणीची काही वर्षे घालवलेले न्यूयॉर्कमधील ऐतिहासिक घर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. क्वीन्स येथील जमैका इस्टेट्सया पॉश भागात असलेले हे ट्यूडर-शैलीतील घर आता $२.३ मिलियन (सुमारे १९ कोटी रुपये) किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे.
हे घर १९४० च्या दशकात ट्रम्प यांचे वडील फ्रेड ट्रम्प यांनी बांधले होते, जे स्वतः एक मोठे रिअल इस्टेट डेव्हलपर होते. या घरात ट्रम्प यांनी त्यांच्या बालपणीची चार वर्षे घालवली होती. २०१६ मध्ये, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी एका मुलाखतीत या घराच्या जीर्ण अवस्थेबद्दल 'दु:खद' भावना व्यक्त केली होती, पण त्याच वेळी त्यांचे बालपण तिथे खूप चांगले गेल्याचेही सांगितले होते.
काही वर्षांपूर्वी हे घर अत्यंत जीर्ण अवस्थेत होते आणि जंगली मांजरींचा अड्डा बनले होते. मात्र, रिअल इस्टेट डेव्हलपर टॉमी लिन यांनी मार्चमध्ये हे घर $८,३५,००० मध्ये विकत घेतले. त्यानंतर त्यांनी सुमारे $५,००,००० खर्च करून घराचे पूर्ण नूतनीकरण केले. या नूतनीकरणामुळे आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजकीय व भावनिक मूल्यामुळे या घराची किंमत आता थेट $२.३ मिलियनपर्यंत पोहोचली आहे.
ट्यूडर शैलीत बांधलेल्या या आलिशान घरात आता अनेक मॉडर्न अपडेट्स करण्यात आले आहेत: या घरात पाच बेडरूम, तीन पूर्ण स्नानगृहे आणि दोन छोटी स्नानगृहे, दोन कारसाठी स्वतंत्र गॅरेज, नूतनीकृत तळघर, हेरिंगबोन लाकडी फ्लोअरिंग, नवीन आणि हाय-एंड किचन आदी या घरामध्ये आहे.
Web Summary : Donald Trump's childhood home in Queens, New York, is for sale for $2.3 million. Trump lived there for four years. Recently renovated, it boasts modern updates and increased value due to its Trump connection.
Web Summary : न्यूयॉर्क के क्वींस में डोनाल्ड ट्रम्प का बचपन का घर 2.3 मिलियन डॉलर में बिक्री के लिए है। ट्रम्प वहां चार साल रहे। हाल ही में नवीनीकृत, इसमें आधुनिक अपडेट हैं और ट्रम्प कनेक्शन के कारण इसका मूल्य बढ़ गया है।