डोनाल्ड ट्रम्पचं राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासाठी 5 शब्दांचं पत्र व्हायरल, जाणून घ्या सत्य

By महेश गलांडे | Published: January 21, 2021 10:06 AM2021-01-21T10:06:38+5:302021-01-21T10:08:01+5:30

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शेवटपर्यंत आपला पराभव मान्य केला नाही. निवडणुकांच्या निकालापासूनच त्यांचा पराभव आणि बायडन यांचा विजय वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.

Donald Trump's 5 word letter to Joe Biden goes viral, find out the truth | डोनाल्ड ट्रम्पचं राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासाठी 5 शब्दांचं पत्र व्हायरल, जाणून घ्या सत्य

डोनाल्ड ट्रम्पचं राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासाठी 5 शब्दांचं पत्र व्हायरल, जाणून घ्या सत्य

Next
ठळक मुद्देट्रम्प यांच्या या व्हायरल पत्रावरुन सोशल मीडियात नेटीझन्स चांगलीच मजा घेत आहेत. ट्रम्प यांनी या पत्रात नवीन राष्ट्राध्यक्षांचं अभिनंदन केलं नाही, याउलट Joe, You Know I Won 'तुम्हालाही माहितीय, माझाच विजय झालाय', असे म्हटलं आहे.

वॉशिंग्टन - कोरोनामुळे मरगळलेली अर्थव्यवस्था, कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे वाढत चाललेली मृतांची संख्या, कॅपिटॉल हिलवर अलीकडेच झालेला हल्ला, अशी चारही बाजूंनी निराशाजनक परिस्थिती असताना व्हाइट हाउसच्या प्रांगणात नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकेच्या ४६व्या अध्यक्षपदाची तर कमला हॅरिस यांनी उपाध्यक्षपदाची शपथ घेतली. या वेळी असंख्य मान्यवर उपस्थित होते. मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या सोहळ्याला पाठ दाखवली. मात्र, मावळते उपाध्यक्ष माइक पेन्स या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते. 

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शेवटपर्यंत आपला पराभव मान्य केला नाही. निवडणुकांच्या निकालापासूनच त्यांचा पराभव आणि बायडन यांचा विजय वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. अखेर, तेथील सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर व्हाईट हाऊस सोडल्याशिवाय ट्रम्प यांना पर्याय नव्हता. तरीही, ट्रम्प समर्थकांनी व्हाईट हाऊसवर मोर्चा काढला होता, काही प्रमाणात हिंसाचारही केला. मात्र, ट्रम्प यांना व्हाईट हाऊस सोडून जावेच लागले. जो बायडन यांनी व्हाईट हाऊसच्या प्रांगणात राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. तत्पूर्वी व्हाईट हाऊस सोडताना डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडन यांच्यासाठी एक पत्र सोडले असून ते व्हायरल झाले आहे. मात्र, या पत्राच्या सत्यतेबाबत अनेक प्रश्न आहेत. 

ट्रम्प यांच्या या व्हायरल पत्रावरुन सोशल मीडियात नेटीझन्स चांगलीच मजा घेत आहेत. ट्रम्प यांनी या पत्रात नवीन राष्ट्राध्यक्षांचं अभिनंदन केलं नाही, याउलट Joe, You Know I Won 'तुम्हालाही माहितीय, माझाच विजय झालाय', असे म्हटलं आहे. अनेक फॅक्ट चेक साईट्सने हे पत्र फेक असल्याचं म्हटलंय. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपती असताना लिहिलेल्या पत्रातील शाई आणि या पत्रातील शाईमध्ये फरक आहे. तर, बायडन यांनी आपल्या शपथग्रहण समारोहात ट्रम्प यांच्या पत्राचा उल्लेख केला, पण याबद्दल काहीही बोलले नाहीत तसेच, ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुनही या पत्राचा उल्लेख केला नाही, किंवा ते शेअरही केलं नाही. त्यामुळे, हे पत्र फेक असल्याचं लक्षात येतं. दरम्यान, शपथविधी सोहळ्याला ट्रम्प यांची गैरहजेरी होती, काही तास अगोदर ते 'मरीन वन' या हेलिकॉप्टरने फ्लोरिडासाठी रवाना झाले होते.  

Web Title: Donald Trump's 5 word letter to Joe Biden goes viral, find out the truth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.