वॉश्गिंटन - अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी कृषी आयातीवर नव्याने टॅरिफ लावण्याचे संकेत दिलेत. ज्यात भारतीय तांदूळ आणि कॅनेडियन खतांचा समावेश असू शकतो. अमेरिकन शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यात स्वस्त दरातील परदेशी वस्तूंमुळे अमेरिकन उत्पादकांना नुकसान पोहचत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार,टॅरिफमुळे प्रभावित झालेल्या अमेरिकन शेतकऱ्यांसाठी १२ बिलियन डॉलर पॅकेजची घोषणा करण्यात आली. व्हाइट हाऊसमध्ये आयोजित एका गोलमेज परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि कॅनडा यांच्यावर नव्याने टॅरिफ लावण्याचे संकेत दिले. काही देश अमेरिकन बाजारपेठेत कमी दरात तांदूळ टाकत असल्याचा आरोप होत आहे. सरकार त्या आरोपांची पडताळणी करणार असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटलं. बैठकीला असणाऱ्या शेतकऱ्यांनी ट्रम्प यांच्यावर कठोर कारवाईसाठी दबाव टाकला. बाजारपेठेत कमी किंमतीत परदेशी तांदूळ येत असल्याने अमेरिकन बाजारावर त्याचा परिणाम होत आहे. घरगुती वस्तूच्या किंमती त्यामुळे घसरत असल्याचा तर्क त्यांनी लावला.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ट्रम्प यांनीही कठोर भूमिका घेतली. त्यांनी थेट पणे कमी किंमतीत माल विकणारे देश विश्वासघात करत आहेत असं सांगत या देशांवर नव्याने टॅरिफ लावण्याचे संकेत दिले. कॅनेडियन आयात खतांवरही टॅरिफ लावला जाऊ शकतो असं ट्रम्प यांनी म्हटलं. लुइसियाना येथे कॅनेडी राइस मिलच्या सीईओ मेरिल कॅनेडी यांनी बैठकीत डंपिंग करणाऱ्या देशांमध्ये भारत, थायलँड आणि चीन असल्याचे सांगितले. चीन तांदूळ थेट अमेरिकेत नाही तर प्यूर्टो रिकोला पाठवत आहे. ज्यामुळे दक्षिण अमेरिकेत तांदूळ उत्पादकांवर संकट ओढावले आहे. टॅरिफमुळे काही प्रमाणात चाप बसला आहे परंतु आपल्याला ते दुप्पट करण्याची गरज आहे असंही बैठकीत मेरिल कॅनेडी यांनी ट्रम्प यांच्याकडे मागणी केली.
दरम्यान, भारताला अमेरिकेत तांदूळ विक्री करण्याची परवानगी आहे का असं ट्रम्प यांनी सहकारी मंत्र्याला विचारले. त्यावर नाही, आपण अजून त्यांच्याशी व्यापारावर चर्चा करत आहोत असं उत्तर मिळाले. त्यानंतर कॅनेडी यांनी भारत कशाप्रकारे बेकायदेशीर सब्सिडीसोबत तांदूळ उद्योग करत असल्याचं सांगितले. भारतासोबत थायलँड आणि चीनही यांच्यावर बैठकीत नाराजीचा सूर निघाला. लवकरच या प्रकरणात कारवाई केली जाईल असं आश्वासन ट्रम्प यांनी शेतकऱ्यांना दिले. विशेष म्हणजे हा प्रकार अशावेळी उघडकीस आला आहे जेव्हा भारत आणि अमेरिका दोघेही त्यांच्या आर्थिक संबंधांना स्थिर करण्यासाठी व्यापारी करारावर भर देत आहेत. ट्रम्प यांनी याआधी भारतीय वस्तूंवर ५० टक्के टॅरिफ लावले होते.
Web Summary : Trump considers doubling tariffs on Indian rice following US farmers' complaints of unfair competition. He also targeted Canadian fertilizers, alleging that subsidized imports hurt American producers. Further action is expected soon.
Web Summary : अमेरिकी किसानों की शिकायत के बाद ट्रम्प ने भारतीय चावल पर शुल्क दोगुना करने का संकेत दिया। उन्होंने कनाडाई उर्वरकों को भी निशाना बनाया, आरोप लगाया कि सब्सिडी वाले आयात अमेरिकी उत्पादकों को नुकसान पहुंचाते हैं। जल्द ही और कार्रवाई की उम्मीद है।