Mehul Choksi: मेहुल चोक्सीला भारताकडे सोपवावं; डोमिनिका सरकारची न्यायालयात स्पष्ट भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 11:12 PM2021-06-02T23:12:13+5:302021-06-02T23:18:47+5:30

Mehul Choksi: मेहुल चोक्सीला भारताकडे सोपवले जाणार की नाही, याबाबत उद्या न्यायालय निकाल देणार आहे.

dominica government tells court that mehul choksi has to be deported to India | Mehul Choksi: मेहुल चोक्सीला भारताकडे सोपवावं; डोमिनिका सरकारची न्यायालयात स्पष्ट भूमिका

Mehul Choksi: मेहुल चोक्सीला भारताकडे सोपवावं; डोमिनिका सरकारची न्यायालयात स्पष्ट भूमिका

Next

रोसेऊ: मेहुल चोक्सीने केलेली याचिका वैध नसून, त्याला भारताकडे सोपवावं, अशी स्पष्ट भूमिका डोमिनिका सरकारने न्यायालयात मांडली आहे. मेहुल चोक्सीला भारताकडे सोपवले जाणार की नाही, याबाबत उद्या न्यायालय निकाल देणार आहे. मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासंदर्भातील याचिकेवरील सुनावणी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर बुधवारी स्थगित करण्यात आली. (dominica government tells court that mehul choksi has to be deported to India) 

मेहुल चोक्सीचे प्रत्यार्पण होणार की नाही, यावर आता गुरुवारी निर्णय देण्यात येणार आहे. डोमिनिका येथील स्थानिक न्यायालयात यासंदर्भात सुनावणी सुरू असून, मेहुल चोक्सी देखील ऑनलाईन हजर होता. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने उद्यापर्यंत निर्णय राखून ठेवला आहे. 

मेहुल चोक्सीला मॅजिस्ट्रेटसमोर हजर करणार!

मेहुल चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, तेथील स्थानिक कायद्यानुसार मेहुल चोक्सीला अटक केल्यानंतर ७२ तासांत न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. न्यायालयानेही तसे निर्देश दिले आहेत. न्यायदंडाधिकारींचा आदेश आल्यानंतर न्यायालयातील सुनावणी पुन्हा सुरू होईल, असे ते म्हणाले. 

ईडी आणि सीबीआयची टीम हजर

डोमिनिका येथील स्थानिक न्यायालयात भारताच्या वतीने बाजू मांडण्यासाठी ईडी आणि सीबीआयचे एक पथक डोमिनिका येथे गेले असून, ते या सुनावणीवेळी हजर होते. मेहुल चोक्सीला अँटिग्वात पाठवणार की, भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा होणार, हे या निकालावर अवलंबून असल्याचे सांगितले जात आहे. 

मेहुल चोक्सीला भारतात आणणे शक्य!

इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटीसीच्या आधारावर मेहुल चोक्सीला भारतात आणणे शक्य आहे. मेहुल चोक्सी अँटिग्वाचा नागरिक असल्याचा दावा करत असला, तरी भारताने त्याचे नागरिकत्व अजून रद्द केलेले नाही. त्यामुळे त्याला भारताकडे सोपवले जाऊ शकते, असे सांगितले जात आहे. यापूर्वी माझ्या पतीची प्रकृती ठीक नसते. माझे पती अँटिग्वाचे नागरिक आहेत. त्यांना तेथील संविधानानुसार सर्व  सुरक्षा मिळण्याचा अधिकार आहे. माझे पती सुरक्षितरित्या अँटिग्वा येथे येतील यावर माझा विश्वास आहे, असे मेहुल चोक्सीच्या पत्नीने एएनआयशी बोलताना म्हटले होते. 

दरम्यान, पंजाब नॅशनल बॅकेत १३ हजार ५०० कोटींचा घोटाळा करून मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी फरार झाले आहेत. नीरव मोदीला लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे. तर मेहुल चोक्सी अँटिग्वामध्ये लपून बसला होता. मात्र, २३ मे रोजी मेहुल चोक्सी पोलिसांच्या हाती लागला. मेहुल चोक्सी जानेवारी २०१८ मध्ये भारतातून पळाला होता.
 

Web Title: dominica government tells court that mehul choksi has to be deported to India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.