'चहाच्या कपात आपलं Semen टाकून महिलेला प्यायला दिलं', डॉक्टरवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 12:49 PM2022-01-20T12:49:17+5:302022-01-20T12:49:39+5:30

'डेली मेल'च्या रिपोर्टनुसार, ५४ वर्षीय डॉक्टरचं नाव जॉन चॅपमॅन आहे. निकोलस Taunton च्या एका हेल्थ सेंटरमध्ये काम करत होता.

Doctor putting his own semen into cup of tea and gave woman patient appears in court | 'चहाच्या कपात आपलं Semen टाकून महिलेला प्यायला दिलं', डॉक्टरवर कारवाई

'चहाच्या कपात आपलं Semen टाकून महिलेला प्यायला दिलं', डॉक्टरवर कारवाई

Next

ब्रिटनमध्ये एका डॉक्टरवर महिलेला चहामधून आपलं Semen मिश्रित करून देण्याचा आरोप लागला आहे. याप्रकरणी डॉक्टरवर कोर्टात केस सुरू आहे आणि याच आठवड्यात डॉक्टर कोर्टासमोर हजर झाला. तेव्हाच या घटनेचे डिटेल्स समोर आले. त्याच्यावर विना सहमती सेक्शुअल अ‍ॅक्टिविटीचा आरोप लागला आहे. 

'डेली मेल'च्या रिपोर्टनुसार, ५४ वर्षीय डॉक्टरचं नाव जॉन चॅपमॅन आहे. निकोलस Taunton च्या एका हेल्थ सेंटरमध्ये काम करत होता. पण आता त्याला त्याच्या पदावरून निलंबित करण्यात आलं आहे. डॉक्टर निकोलसवर आरोप आहे की त्याने एका महिलेला पेय पदार्थ त्याचं Semen मिश्रित करून दिलं. महिलेने दावा केला की, जेव्हा तिने जवळपास पूर्ण चहा प्यायला तेव्हा तिला कपात Semen दिसलं.

गेल्यावर्षी १३ सप्टेंबरला झालेल्या या घटनेवर नुकतीच Taunton मॅजिस्ट्रेट कोर्टात सुनावणी झाली. प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान निकोलस विरोधात आरोपांची माहिती देण्यात आली. मात्र, डॉक्टरने त्याच्यावर लावलेले आरोप नाकारले आहेत.
निकोलसवर सहमती विना सेक्शुअल अ‍ॅक्टिविटी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मॅजिस्ट्रेट यांना सांगण्यात आलं की,  पीडितेने ड्रिंक संपवल्यावर तिला कपात Semen दिसलं. जे डॉक्टरने तिला कपात दिलं होतं. या घटनेची सूचना तीन दिवसांनंतर पोलिसांना दिली गेली. ज्यानंतर हे प्रकरण वाढलं. सध्या डॉक्टर निकोलसला सशर्त जामीनावर सोडण्यात आलं आहे.

हे पण वाचा :

Truecaller वरदान आहे की, शाप? जाणून घ्या लपवलेल्या गोष्टी
 

Web Title: Doctor putting his own semen into cup of tea and gave woman patient appears in court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.