ज्याला समजलं मातीत दबलेला कचरा, तो निघाला सोन्याचा खजिना; वैज्ञानिकांचा मोठा शोध

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 04:15 PM2021-09-11T16:15:47+5:302021-09-11T16:19:04+5:30

Schytz आपल्या क्लासमेटच्या जमिनीवर स्कॅन करण्यासाठी  आपल्या मेटल डिटेक्टरसोबत फिरायला निघाला होता.

Denmark archeologist discovers two pound gold biggest treasure of danish history | ज्याला समजलं मातीत दबलेला कचरा, तो निघाला सोन्याचा खजिना; वैज्ञानिकांचा मोठा शोध

ज्याला समजलं मातीत दबलेला कचरा, तो निघाला सोन्याचा खजिना; वैज्ञानिकांचा मोठा शोध

googlenewsNext

पुरातत्ववाद्यांना जमिनीखाली दडलेला ऐतिहासिक खजिना सापडला आहे. डेनमार्कच्या जेलिंगजवळ विन्डेलीवमध्ये डिटेक्टरिस्ट ole Ginnerup Schytz च्या हाती हा खजिना लागलाय. त्यानंतर वेजले संग्रहालयातील पुरातत्ववाद्यांनी साइटवर खोदकाम केलं आणि वायकिंगच्या युगाआधीच्या २२ बहुमूल्य कलाकृती शोधल्या. Schytz ने सांगितलं की, त्याने नशीबाने या खजिन्याचा शोध लावला.

Schytz आपल्या क्लासमेटच्या जमिनीवर स्कॅन करण्यासाठी  आपल्या मेटल डिटेक्टरसोबत फिरायला निघाला होता. त्यांना अजिबात अंदाज नव्हता की, ते डेन्मार्कच्या इतिहासातील सर्वात मोठ्या खजिन्याचा शोध घेणार आहेत. TV2 सोबत बोलताना ते म्हणाले की, खजिन्यातील वस्तू चिखलाने भरलेल्या होत्या. मला याबाबत काहीच माहिती नव्हती. त्यामुळे मला वाटलं की, हे एखाद्या कॅनचं झाकण असेल.

दोन पाउंडपेक्षा जास्त सोनं

नंतर आश्चर्य वाटलं की, हे झाकण नाही तर जमिनीत दबलेल्या सोन्याच्या २० पेक्षा अधिक तुकड्यांपैकी एक आहे. शोधकर्त्यांनी दोन पाउंडपेक्षा अधिक सोन्याचा खजिना शोधल्याची माहिती आहे. ज्यात काही तुकडे फार मोठे आहेत. ते म्हणाले की, डेन्मार्कचं क्षेत्रफळ ४३,००० वर्ग किलोमीटर आहे आणि मी डिटेक्टर त्याच ठिकाणी ठेवलं जिथे हा खजिना दडला होता. असं मानलं जात आहे की, ही साइट १५०० वर्षाआधी गाव राहिली असेल.

डेन्मार्कच्या राष्ट्रीय संग्रहालयात म्युझिअम इन्स्पेक्टर पीटर वांग पीटरसन यांच्यानुसार, हा शोध दशकातील डेन्मार्कमध्ये आढळून आलेल्या सर्वात मोठ्या खजिन्यांपैकी एक आहे. याआधी इस्त्राइलमध्ये पुरात्ववाद्यांच्या हाती बहुमूल्य खजिना लागला होता. Israel Antiquities Authority चे वैज्ञानिकांना इथे अनेक दुर्मीळ ऐतिहासिक कलाकृती सापडल्या होत्या.
 

Web Title: Denmark archeologist discovers two pound gold biggest treasure of danish history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.