Covid Booster Dose: कोरोना लसीच्या बूस्टर डोसची गरज नेमकी कुणाला? WHO च्या तज्ज्ञांनीच केली शिफारस, कारणंही सांगितलं...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 09:21 PM2021-10-11T21:21:28+5:302021-10-11T21:22:18+5:30

कोरोना विरोधी लसीचा बूस्टर डोस (Covid Booster Dose) देण्याच्या मागणीला आता जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) तज्ज्ञांनीही दुजोरा दिला आहे.

Covid Booster Dose WHO experts recommend COVID booster for immunocompromised | Covid Booster Dose: कोरोना लसीच्या बूस्टर डोसची गरज नेमकी कुणाला? WHO च्या तज्ज्ञांनीच केली शिफारस, कारणंही सांगितलं...

Covid Booster Dose: कोरोना लसीच्या बूस्टर डोसची गरज नेमकी कुणाला? WHO च्या तज्ज्ञांनीच केली शिफारस, कारणंही सांगितलं...

Next

कोरोना विरोधी लसीचा बूस्टर डोस (Covid Booster Dose) देण्याच्या मागणीला आता जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) तज्ज्ञांनीही दुजोरा दिला आहे. डब्ल्यूएचओच्या लसीकरण सल्लागार पथकातील तज्ज्ञांनी ज्या व्यक्तींची रोगप्रतिकारक क्षमता कमकुवत आहे अशा व्यक्तींनी डब्ल्यूएचओकडून परवानगी मिळालेल्या लसीचा (Covid-19 Vaccine)  बूस्टर डोस द्यायला हवा, असा सल्ला दिला आहे. जभरातील अनेक देशांमध्ये कोरोना विरोधातील लढ्यात वेगानं लसीकरण (Vaccination) केलं जात आहे. पण ठरावीक कालावधीनंतर लसीची परिणामकारकता कमी होत असल्याचीही प्रकरणं पुढे आली आहेत. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी लसीचा तिसऱ्या डोस देण्यास पाठिंबा दिला आहे. 

"मध्यम आणि गंभीर स्वरुपातील कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तांना कोरोना विरोधी लसीचा अतिरिक्त डोस देण्याची गरज आहे. कारण लसीकरणाच्या दोन डोसनंतरही अशा व्यक्तींमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढण्याची शक्यता कमी असते. याशिवाय अशा व्यक्तींना कोरोना विषाणूची लागण होण्याची शक्यताही अधिक असते", असं संयुक्त राष्ट्राच्या (United Nations)आरोग्य संस्थेच्या तज्ज्ञांच्या लसीकरण मोहिमेच्या रणनितीकार सल्लागार समूहानं म्हटलं आहे. 

CDCनंही केली तिसऱ्या डोसचं समर्थन
सप्टेंबर महिन्यात अमेरिकेच्या साथरोग नियंत्रण संस्थेनं (CDC) देशातील लाखो ज्येष्ठ नागरिक आणि कोरोना संक्रमणाचा सर्वाधिक धोका असलेल्या व्यक्तींना लसीचा तिसरा डोस दिला जाण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. तिसऱ्या डोससाठीचं महत्त्वपूर्ण पाऊल उचलून कोरोना संक्रमणाविरोधीतील अमेरिकेच्या लसीकरण मोहिमेचा नवा अध्याय सुरू केला जाऊ शकतो. सीडीसीचे संचालक डॉ. रोशेल वालेन्स्की यांनी सल्लागार समितीनं केलेल्या शिफारसींच्या अहवालावर स्वाक्षरी देखील केली आहे. सल्लागारांनी दिलेल्या अहवालात ६५ वर्षांवरील अधिक वयोगटातील नागरिक, नर्सिंग होममध्ये राहणारे आरोग्य कर्मचारी आणि आरोग्य संबंधी समस्याचा सामना करणाऱ्या ५० ते ६४ वयोगटातील नागरिकांना लसीचा तिसरा डोस देण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. 

बूस्टर डोससाठी जॉन्सन अँड जॉन्सन मागितली परवानगी
जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीनं गेल्याच आठवड्यात एफडीएकडे कंपनीच्या कोरोना विरोधी लसीचा तिसऱ्या डोस देण्यासाठीची परवानगी मागितली आहे. कारण अमेरिकन सरकारनं लाखो अमेरिकी नागरिकांना तिसरा डोस देण्याच्या मोहिमेलाही आता सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीनं एफडीएकडे शिफारस केली आहे. 

Web Title: Covid Booster Dose WHO experts recommend COVID booster for immunocompromised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.