Britain सरकारचा मोठा निर्णय; १२ ते १५ वयोगटातील मुलांना दिली जाणार Pfizer ची कोरोना लस 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 05:27 PM2021-06-04T17:27:09+5:302021-06-04T17:28:29+5:30

Coronavirus Vaccine : ब्रिटनच्या सरकारनं १२ ते १५ वर्षांच्या मुलांना फायझरची लस देण्यास दिली मंजुरी. तिसऱ्या लाटेपासून मुलांच्या संरक्षणासाठी मोठा निर्णय.

COVID 19 vaccine UK approves Pfizer jab for 12 to 15 year olds coronavirus third wave | Britain सरकारचा मोठा निर्णय; १२ ते १५ वयोगटातील मुलांना दिली जाणार Pfizer ची कोरोना लस 

प्रातिनिधीक छायाचित्र

googlenewsNext
ठळक मुद्दे ब्रिटनच्या सरकारनं १२ ते १५ वर्षांच्या मुलांना फायझरची लस देण्यास दिली मंजुरी. अंदाज वर्तवण्यात येत असलेल्या तिसऱ्या लाटेपासून मुलांच्या संरक्षणासाठी मोठा निर्णय.

अद्यापही कोरोना विषाणू जगभरात थैमान घालत आहे. अनेक देशांना कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. अंदाज वर्तवण्यात येत असलेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून (Third wave of Coronavirus) मुलांचं संरक्षण करण्यासाठी ब्रिटनच्या सरकारनं (Britain Government) मोठी घोषणा केली आहे. यानुसार १२ ते १५  वयोगटातील मुलांना फायझरची कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे. फायझर बायोएनटेकची लस (Pfizer/BioNTech) या वयोगटातील मुलांसाठी सुरक्षित असल्याचं चाचणीदरम्यान दिसून आल्यानं ब्रिटनच्या औषध नियामकानं शुक्रवारी मंजुरी दिली.

"आम्ही अतिशय सावधगिरी बाळगून १२ ते १५ वर्षे या वयोगटातील मुलांच्या वैद्यकीय चाचणीचा अभ्यास केला. त्यानंतर या वयोगटातील मुलांसाठी ही लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचं दिसू आलं. या लसीमुळे धोक्यापेक्षा अधिक फायदे आहेत," असं ब्रिटनच्या मेडिसिंस अँड हेल्थकेअर प्रोडक्ट रेग्लुलेटरी एजन्सीच्या प्रमुख जून रेन यांनी सांगितलं. यापूर्वी युरोपमध्येही १२ ते १५ या वयोगटातील मुलांना ही लस देण्यास मंजुरी दिली असल्याचंही त्यांनी सांगितलं. २८ मे रोजी युरोपियन मेडिसिन एजन्सीनं (EMA) यासंबंधी घोषणा केली होती.

मुलांवर साईडइफेक्ट्स नाही

ही लस दिल्यानंतर मुलांवर कोणत्याही प्रकारचे साईडइफेक्ट्स दिसले नाहीत असं युरोपियन महासंघाच्या औषध नियमाकाकडून सांगण्यात आलं. या लसीची योग्यरित्या पडताळणी करण्यात आली आहे. त्यानंतरच आम्ही या निर्णयावर पोहोचलो आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. "लहान मुलांवर लस दिल्यानंतर कोणत्याही प्रकारचे गंभीर परिणाम दिसून आले नाहीत. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही," असं EMA चे लसीकरण रणनिती प्रमुख मार्को कावालेरी यांनी सांगितलं.

Web Title: COVID 19 vaccine UK approves Pfizer jab for 12 to 15 year olds coronavirus third wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.