Coronavirus : जगातील पहिला कोरोना पॉझिटीव्ह प्राणी आढळला, प्राणीसंग्रहालयातील वाघिणीला संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 09:32 AM2020-04-06T09:32:44+5:302020-04-06T09:33:51+5:30

अमेरिकेत करोनाचा कहर दिवसेंदिवस वाढू लागला आहे. कोरोनापुढे महास्ता म्हणवली जाणारी अमेरिकाही पुरती हतबल झाली आहे. असे असतानाच अमेरिकेतील एका माध्यमांने धक्कादायक खुलासा केला आहे

Coronavirus: world's first Corona-positive animal found, infected with zoo tiger in america MMG | Coronavirus : जगातील पहिला कोरोना पॉझिटीव्ह प्राणी आढळला, प्राणीसंग्रहालयातील वाघिणीला संसर्ग

Coronavirus : जगातील पहिला कोरोना पॉझिटीव्ह प्राणी आढळला, प्राणीसंग्रहालयातील वाघिणीला संसर्ग

googlenewsNext

नवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात करण्यात आलेले लॉकडाऊन १५ एप्रिलनंतर मागे घेण्याची मागणी राज्यांमागून राज्ये करत असले तरी केंद्र सरकार चिंतेत असून निर्बंध शिथील करण्याबाबत कमालीची काळजी घेत आहे. देशात ७१२ जिल्ह्यांपैकी कोविड-१९ चे जिल्हे २११ वरून २७४ झाले ते फक्त तीन दिवसांत. हा फैलाव देशात ४० टक्के भागात झाला आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग दिवसेंदविस वाढताना दिसून येत आहे. अमेरिकेत तर कोरोनाने हाहाकार माजला आहे. मात्र, जगभरातील पहिला कोरोना पॉझिटीव्ह प्राणी अमेरिकेत आढळला आहे. न्यूयॉर्क येथील एका वाघिणीला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे, मानसांसह आता प्राण्यांमध्येही कोरोनाच धोका निर्माण झाला आहे. 

अमेरिकेत करोनाचा कहर दिवसेंदिवस वाढू लागला आहे. कोरोनापुढे महास्ता म्हणवली जाणारी अमेरिकाही पुरती हतबल झाली आहे. असे असतानाच अमेरिकेतील एका माध्यमांने धक्कादायक खुलासा केला आहे. चीनने कोरोनाव्हायरसचा खुलासा केल्यानंतर जवळपास 4,30,000 लोक चीनमधून थेट अमेरिकेत आले होते. यातील हजारो लोक चीनमधील वुहान शहरातून आले होते. चीनमधील वुहान शहरातूनच डिसेंबर 2019मध्ये  कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण समोर आला होता, असे अमेरिकेतील द न्यू यॉर्क टाइम्सने म्हटले आहे. मात्र, आता फक्त माणसांनाच नाही तर न्यूयॉर्कमध्ये प्राण्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. न्यूयॉर्कच्या प्राणीसंग्रहालयातील वाघिण कोरोना पॉझिटिव्ह आहे. नॅशनल जॅग्रॉफीने यासंदर्भात वृत्त दिले आहे. 

न्यूयॉर्कच्या ब्रॉन्क्स प्राणीसंग्रहालयात वाघिण पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ माजली आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या राष्ट्रीय पशुवैद्यकीय सेवा प्रयोगशाळेच्या विभागानुसार प्राण्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह होण्याची ही पहिली घटना आहे. ब्रॉन्क्स प्राणीसंग्रहालयाच्या वाइल्डलाइफ कन्झर्वेशन सोसायटीच्या मते, कोरोना प्राणीसंग्रहालयातील एका कर्मचाऱ्यामुळे 4 वर्षाच्या या वाघिणीला कोरोनाची लागण झाली आहे. या कर्मचाऱ्याला आधीपासूनच कोरोनाचा संसर्ग झाला असेल आणि वाघ त्याच्या संपर्कात आल्यानंतर तो कोरोना पॉझिटीव्ह झाला. या वाघिणीचं नाव नाडिया असून गेल्या १६ मार्चपासून हे प्राणीसंग्रहालय पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे या वाघिणीच्या संसर्गातून पर्यटकांना लागण झाल्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, आता प्राण्यांनाही कोरोनाची लागण होऊ शकते हे सिद्ध झाले आहे. 

दरम्यान, आतापर्यंत ११ लाखहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून ६३ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये आतापर्यंत १५ हजारहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकतही कोरोनामुळे ३ लाखांहून अधिक जणांचा कोरोनाची बाधा झाली आहे. तर, आतापर्यंत ७ हजार,९०० जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
 

Web Title: Coronavirus: world's first Corona-positive animal found, infected with zoo tiger in america MMG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.