Coronavirus : चीनमध्ये आतापर्यंत ६६,००० लोकांना डिस्चार्ज, ब्रिटन, आयर्लंडमधील प्रवाशांना अमेरिकेत येण्यास बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 05:03 AM2020-03-16T05:03:41+5:302020-03-16T05:11:54+5:30

चीनमध्ये कोरोनाचे २० नवे रुग्ण समोर आले आहेत. देशात आणखी १० लोकांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या आता ३,१९९ झाली आहे. सर्व १० लोकांचा मृत्यू वुहानमध्ये झाला आहे. देशातील रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे.

Coronavirus : So far in China, 66 Thousand people were discharged from hospitals | Coronavirus : चीनमध्ये आतापर्यंत ६६,००० लोकांना डिस्चार्ज, ब्रिटन, आयर्लंडमधील प्रवाशांना अमेरिकेत येण्यास बंदी

Coronavirus : चीनमध्ये आतापर्यंत ६६,००० लोकांना डिस्चार्ज, ब्रिटन, आयर्लंडमधील प्रवाशांना अमेरिकेत येण्यास बंदी

Next

बीजिंग : चीनमध्ये शनिवारपर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या ८०,७७८ वर पोहोचली होती. त्यातील १०,७३४ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत, तर ६६,९११ जणांची प्रकृती ठीक झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. विदेशातून चीनची राजधानी बीजिंगमध्ये आलेल्या सर्व प्रवाशांना सोमवारपासून सुरू होणाऱ्या क्वारंटाईनमध्ये कोरोनासंदर्भातील वैद्यकीय चाचणीसाठी पाठविले जाणार आहे. अन्य देशांतून आॅस्ट्रेलियामध्ये येणा-या प्रवाशांची १४ दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये रवानगी केली जाणार आहे. दरम्यान, जगातील मृतांची संख्या आता ६००० वर पोहोचली आहे.

चीनमध्ये कोरोनाचे २० नवे रुग्ण समोर आले आहेत. देशात आणखी १० लोकांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या आता ३,१९९ झाली आहे. सर्व १० लोकांचा मृत्यू वुहानमध्ये झाला आहे. देशातील रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सांगितले की, विदेशींमुळे संक्रमणाच्या घटना बीजिंग आणि शांघाईमध्ये समोर आल्या आहेत. हुबेईच्या बाहेरील क्षेत्रात सलग तिसºया दिवशी नवा रुग्ण आढळून आलेला नाही.


कोरोनाच्या धास्तीमुळे इटलीपाठोपाठ स्पेननेही देशभरातील नागरिकांना सर्व कामकाज शनिवारी बंद ठेवण्याचा आदेश दिला होता. कार्यालयात जाण्यासाठी, वैद्यकीय कारण किंवा अन्नधान्य खरेदीसाठीच घराबाहेर पडण्याची मुभा नागरिकांना देण्यात आली होती. त्या देशात कोरोनामुळे १५ दिवसांची आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
स्पेनमध्ये ५,७५३ जणांना या विषाणूची लागण झाली असून, आतापर्यंत तिथे १८३ जणांचा बळी गेला आहे.
ब्रिटनमध्ये कोरोनाच्या साथीमुळे राणी एलिझाबेथ दुसरी या बंकिंगहम राजवाड्यातून विंडसर कॅसलमध्ये राहायला गेल्या आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांचा अहवाल निगेटिव्ह
-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे त्यांच्या वैद्यकीय चाचणीतून स्पष्ट झाले आहे. आता ब्रिटन, आयर्लंड या देशांतील प्रवाशांनाही अमेरिकेत येण्यास तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे चीनमध्ये रविवारी आणखी दहा जण मरण पावले असून, त्यामुळे तेथील बळींची संख्या आता ३,१९९ वर पोहोचली आहे.
- ब्राझीलच्या एका शिष्टमंडळाबरोबर डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेत काही दिवसांपूर्वी बैठक झाली होती. या शिष्टमंडळातील काही जणांना कोरोनाची लागण झाल्याचे लक्षात आल्याने ट्रम्प यांनीही वैद्यकीय चाचणी करून घेण्याचे ठरविले होते.

अमेरिकेमध्ये २,७०० जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, ५७ जण मरण पावले आहेत. ब्रिटन, आयर्लंड येथील प्रवाशांनाही अमेरिकेत येण्यास ट्रम्प सरकारने तात्पुरती बंदी घातली असून, ती सोमवार मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.

भारतीय कर्मचा-याला लागण
सुटी संपवून संयुक्त अरब अमिरातीमध्ये परतलेल्या एका भारतीय कर्मचाºयाला कोरोनाची लागण झाली आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये आतापर्यंत ८५ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. इराणमध्ये कोरोना साथीचा आणखी फैलाव झाल्यास त्या देशातील वैद्यकीय सुविधांवर मोठा ताण पडणार आहे.

इस्लाममध्ये तिसºया क्रमांकाची महत्त्वाची धार्मिक वास्तू असलेली इराणमधील अल् अक्सा मशीद बेमुदत काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पाकिस्तानमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ३४ वर पोहोचली आहे.

Web Title: Coronavirus : So far in China, 66 Thousand people were discharged from hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.