Coronavirus : पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडणार; इम्रान खान यांच्याकडून लॉकडाऊनची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 08:13 AM2020-03-25T08:13:31+5:302020-03-25T08:17:29+5:30

इराणच्या सीमेलगत असलेल्या सिंध प्रातांत कोरोनाच्या संसर्गाच्या रुग्णांची संख्या वाढल्यामुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

Coronavirus : Pakistan stays under lockdown amid coronavirus outbreak vrd | Coronavirus : पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडणार; इम्रान खान यांच्याकडून लॉकडाऊनची घोषणा

Coronavirus : पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडणार; इम्रान खान यांच्याकडून लॉकडाऊनची घोषणा

Next

इस्लामाबादः दहशतवादाला कायमच खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानचं कोरोना व्हायरसनं अक्षरशः कंबरडं मोडलं आहे. सध्या पाकिस्तानात कोरोनाग्रस्तांची संख्या 878वर पोहोचली आहे. त्यामुळे पाकिस्तान पुरता कोलडमला आहे. अनेक देशांनी लॉकडाऊन केले असतानाही पाकिस्ताननं लॉकडाऊन केल्यास जनता गरिबीनं उपाशी राहिली, अशी मल्लिनाथी केली होती. कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करण्यासाठी पाकिस्ताननं चीनकडेही मदतीची याचना केली होती. 

इराणच्या सीमेलगत असलेल्या सिंध प्रातांत कोरोनाच्या संसर्गाच्या रुग्णांची संख्या वाढल्यामुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीसुद्धा देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. चहूबाजूंनी वाढता दबाव लक्षात घेता इम्रान खान यांनी पंजाब, खैबर-पख्तूनख, बलुचिस्तान, गिलगिट-बल्टिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तत्पूर्वी कोरोनानं सर्वाधिक प्रभावित झालेल्या सिंधमध्ये पूर्णतः लॉकडाऊन करण्यात आलं होतं. जास्त करून भागात लॉकडाऊनची परिस्थिती आहे. सेनेचे जवान सक्तीचं त्याची अंमलबजावणी कशी होईल, यावर लक्ष केंद्रित करून आहेत, अशी माहिती पाकिस्तान सेनेचे मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी दिली आहे. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी पाकिस्तानी गृहमंत्रालयानं सेनेची मदत मागितली होती. पाकिस्तानी सैन्यानं या कठीण प्रसंगात स्थानिक प्रशासनाला मदतीचा हात दिला आहे. खरं तर कालपर्यंत इम्रान खान लॉकडाऊन करण्यास तयार नव्हते. जर लॉकडाऊन केल्यास मजूर आणि गरीब जनता घरातच उपाशी मरेल, अशी भीती इम्रान खान यांना सतावते आहे. परंतु आंतरराज्य जनसंपर्क महासंचालकां(आयएसपीआर)नी ही जागतिक रोगराई असून, या विषाणूचा प्रादुर्भाव रोखायचा असल्यास जनतेला घराबाहेर पडू न देणं हा एकमेव उपाय असल्याचं स्पष्ट केलं होतं. 

पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनीसुद्धा या संकटाशी मुकाबला करण्यासाठी अतिरिक्त सैन्याच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. तसेच त्यांना वैद्यकीय मदतही पुरवण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानमधली विमान सेवाही खंडित करण्यात आली आहे. सध्या लॉकडाऊन केलेल्या शहरांत शाळा, कॉलेज, दुकानं, ऑफिस, बाजार, मॉल्स, सिनेमागृह हे सर्व बंद करण्यात आलं आहे. अत्यावश्यक सुविधाच सुरू राहणार आहेत. पाकिस्तानमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्याही झपाट्यानं वाढत असून, पाकिस्तानमध्ये कोरोना झालेल्या लोकांची संख्या ९५०वर पोहोचली आहे. त्यात ४०७ रुग्ण हे एकट्या सिंध प्रांतातील आहेत. 
 

Web Title: Coronavirus : Pakistan stays under lockdown amid coronavirus outbreak vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.