Coronavirus उद्रेक! पाच वर्षांपूर्वीच बिल गेट्सनी दिला होता धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 03:08 PM2020-03-23T15:08:01+5:302020-03-23T15:11:20+5:30

जगभरातील सर्वच मोठे देश एकमेकांपासून धोका आहे असे समजून अणूबॉम्ब हल्ल्यापासून वाचण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करत आहेत.

Coronavirus outbreak! Five years ago, Bill Gates gave warning about virus hrb | Coronavirus उद्रेक! पाच वर्षांपूर्वीच बिल गेट्सनी दिला होता धोक्याचा इशारा

Coronavirus उद्रेक! पाच वर्षांपूर्वीच बिल गेट्सनी दिला होता धोक्याचा इशारा

googlenewsNext

वॉशिंग्टन : मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक आणि जगातील दुसरे सर्वात मोठे अब्जाधीश असलेल्या बिल गेट्सनी कोरोना व्हायरससारख्या धोक्याची शक्यता ५ वर्षांपूर्वीच वर्तविले होते. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या एका अहवालानुसार २०१५ मध्ये आफ्रिकेतील इबोलाच्या संकटावेळी गेट्स यांनी फोरममध्ये ही भीती व्यक्त केली होती. पुढील काही दशकांमध्ये जगातील १ कोटी लोकांचा मृत्यू कोणत्या युद्ध किंवा मिसाईलमुळे नाही तर खतरनाक व्हायरसच्या वेगाने पसरण्यामुळे होणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. 


जगभरातील सर्वच मोठे देश एकमेकांपासून धोका आहे असे समजून अणूबॉम्ब हल्ल्यापासून वाचण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करत आहेत. मात्र, महामारीला रोखण्यासाठी खूपच कमी पैसा वापरला जात आगे. यामुळे आम्ही पुढील व्हायरसच्या उच्चाटनासाठी तयार नाही आहोत. २०१४-१६ मध्ये इबोलामुळे जगभरातील २८००० लोक संक्रमित झाले होते. तर ११ हजार लोकांचा मृत्यू झाला होता. पश्चिम आफ्रिकी देशांवर याचा मोठा परिणाम झाला होता. तर कोरोना व्हायरसमुळे केवळ ५ महिन्यांतच १३०३२ लोकांचा मृत्यू झाला असून १८८ देशांमध्ये हा व्हायरस पसरला आहे. नोव्हेंबरमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण समोर आला होता. 


कोरोना सारख्या व्हायरसचे भाकित करताना त्यांनी म्हटले होते की, येणारा व्हायरस असा असेल की त्याचे संक्रमण झाल्यानंतर तुम्हाला चांगले, उत्साहित वाटेल परंतू त्याची माहितीही होणार नाही. विमानातून किंवा बाजारातून याचे संक्रमण पसरू शकते. गेट्स यांनी सांगितलेल्या काही गोष्टी आता खऱ्या होऊ लागल्या आहेत. 


मोठ्या रोगराईवेळी लाखो आरोग्य सेवकांची गरज पडणार आहे. मोबाईल फोनसारख्या चांगल्या तंत्रज्ञानाचा वापर करून एक चांगली प्रतिसाद देणारी यंत्रणा तयार करायची गरज ाहे. यामुळे लोकांना वेगाने माहिती दिली जाईल.  बायोटेक्नॉलॉजीलाही अद्ययावत होण्याची गरज आहे, असेही बिल गेट्स यांनी म्हटले होते. 

Web Title: Coronavirus outbreak! Five years ago, Bill Gates gave warning about virus hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.