CoronaVirus News: कोरोनाचा हाहाकार! अमेरिकेत २४ तासांत दीड लाखांहून अधिक रुग्णांची नोंद

By कुणाल गवाणकर | Published: November 15, 2020 08:43 AM2020-11-15T08:43:04+5:302020-11-15T08:46:20+5:30

CoronaVirus News: कोरोना रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारीत भारत पहिल्या क्रमांकावर

CoronaVirus More than 1 5 million corona patients found in the United States in 24 hours | CoronaVirus News: कोरोनाचा हाहाकार! अमेरिकेत २४ तासांत दीड लाखांहून अधिक रुग्णांची नोंद

CoronaVirus News: कोरोनाचा हाहाकार! अमेरिकेत २४ तासांत दीड लाखांहून अधिक रुग्णांची नोंद

Next

वॉशिंग्टन: अमेरिकेत कोरोनानं अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. अमेरिकेत दररोज कोरोनाचे १ लाखाहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्याचा थेट परिणा आरोग्य व्यवस्थेवर होत आहे. गेल्या २४ तासांत अमेरिकेत कोरोनाचे १ लाख ५७ हजार रुग्ण आढळून आले. तर १ हजार २६० जणांचा मृत्यू झाला. अमेरिकेनंतर भारताचा क्रमांक लागतो. भारतात सध्याच्या घडीला दररोज ४० ते ४५ हजार कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. या यादीत ब्राझील तिसऱ्या स्थानी आहे. ब्राझीलमध्ये काल दिवसभरात कोरोनाचे २९ हजार ४६३ कोरोना रुग्ण सापडले. तर ७२७ कोरोना रुग्ण मृत्यूमुखी पडले.

आतापर्यंत सुरक्षित असलेल्या पृथ्वीवरील या भागांत कोरोनाचा शिरकाव, संसर्गाची भीती वाढली

अमेरिकेतील कोरोना रुग्णांचा आकडा १५ नोव्हेंबरला १ कोटी १२ लाख २६ हजारांवर पोहोचला. यापैकी २ लाख ५१ हजार २५६ जणांचा मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोना बाधितांची संख्या ८८ लाखांहून अधिक आहे. यातील १ लाख २९ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत ५८ लाख ४८ हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. देशात १ लाख ६५ हजारांपेक्षा अधिक जणांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे.

Pfizer ची कोरोना लस टोचल्यावर कसे वाटले? व्हॉलंटिअर म्हणाले "भयानक साईडइफेक्ट"

अमेरिकेत आतापर्यंत ६८.९१ लाख जण कोरोनातून बरे झाले आहेत. मात्र सध्याच्या घडीला उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ४० लाखांपेक्षा अधिक आहे. भारतातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९३ टक्क्यांवर पोहोचला आहे. कोरोनाची बाधा झालेल्या ८८ लाखांपैकी ८२ लाख रुग्ण बरे झाले आहेत. सध्याच्या घडीला उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ५ लाखांहून कमी आहे. ब्राझीलमध्ये सध्या ४ लाखांपेक्षा कमी जणांवर उपचार सुरू आहेत. तर कोरोनावर मात केलेल्यांची संख्या ५३ लाखांजवळ पोहोचली आहे.

सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या बाबतीत भारत सध्या जगात दुसऱ्या स्थानावर आहे. भारतात कोरोना रुग्ण बरे होण्याची टक्केवारी सर्वाधिक आहे. सर्वाधिक मृत्यूंच्या संख्येत देशाचा क्रमांक जगात तिसरा आहे. तर ऍक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत देश चौथ्या स्थानी आहे.

Web Title: CoronaVirus More than 1 5 million corona patients found in the United States in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.