CoronaVirus News : लय भारी! 'या' देशाने तयार केला 'चमत्कारिक मास्क'; कोरोनाचा करणार 99 टक्के खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 09:43 AM2020-06-23T09:43:10+5:302020-06-23T09:44:36+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: संसर्ग टाळण्यासाठी घराबाहेर पडताना मास्क लावणं आवश्यक आहे. अनेक ठिकाणी मास्क लावणं अनिवार्य करण्यात आलं असून न लावल्यास दंड आकारण्यात आला आहे.

CoronaVirus Marathi News Israel's miracle mask Sonovia expects 99% corona success | CoronaVirus News : लय भारी! 'या' देशाने तयार केला 'चमत्कारिक मास्क'; कोरोनाचा करणार 99 टक्के खात्मा

CoronaVirus News : लय भारी! 'या' देशाने तयार केला 'चमत्कारिक मास्क'; कोरोनाचा करणार 99 टक्के खात्मा

Next

जेरुसलेम - जगातील अनेक देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी तंत्रज्ञानाचा देखील मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. संसर्ग टाळण्यासाठी घराबाहेर पडताना मास्क लावणं आवश्यक आहे. अनेक ठिकाणी मास्क लावणं अनिवार्य करण्यात आलं असून न लावल्यास दंड आकारण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मास्क लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्या बाजारात विविध प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत. याच दरम्यान अनेक दिलासादायक घटना समोर येत आहेत.

इस्रायलमधील एका कंपनीने खास 'चमत्कारिक मास्क' तयार केला आहे. हा भन्नाट मास्क 99 टक्के कोरोना व्हायरसचा खात्मा करणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. कंपनीने एक असं कापड तयार केलं आहे जे अनेकदा धुतल्यानंतरही कोरोना व्हायरस जवळपास 99 टक्के नष्ट करू शकतो. जगभरात सध्या या Miracle Mask ची चर्चा रंगली आहे. रिपोर्टनुसार, इस्रायलच्या Sonovia या कंपनीने हा खास मास्क केला असून हा मास्क 99 टक्के व्हायरसचा खात्मा करतो असा दावा करण्यात आला आहे. 

Sonovia या कंपनीने खास कापडापासून हा मास्क तयार केला आहे. त्यावर Zinc oxide nano-particles चं कोटिंग केलेलं आहे. या कोटिंगमुळे 99 टक्के बॅक्टेरिया आणि व्हायरस निष्क्रिय होतात असा दावा कंपनीने केला आहे. चीनच्या शांघाई मधल्या Microspectrum लॅबमध्ये या मास्कचं परिक्षण करण्यात आलं आहे. यामध्ये मास्कमुळे 99 टक्के कोरोना व्हायरसचा खात्मा करण्यात आल्याचं म्हटलं आहे. सोनोवियाच्या चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर लिआट गोल्डहामर यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत हे कापड रुग्णालय आणि उपकरणांमध्येही वापरल जाऊ शकतं. ज्यामुळे व्हायरसचा खात्मा करण्यास मदत होईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.


 
कोरोनावर अद्याप कोणतीही लस  किंवा औषध उपलब्ध झालेलं नाही. यासाठी जगभरात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र याच दरम्यान अनेक दिलासादायक घटना समोर येत आहेत. कोरोनाच्या क्रमवारीत भारत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. देशातील औषध तयार करणाऱ्या कंपन्यांना दोन औषधांचे तीन जेनेरिक व्हर्जन काढण्यासाठी सरकारकडून मान्यता मिळाली आहे. यात ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) रेमडेसिव्हर (Remdesivir) आणि फेवीपिरवीर (Favipiravir) औषधांची निर्मिती करणार आहे. अनेक ठिकाणी त्याची क्लिनिकल चाचणी झाली असून परिणाम चांगले आले आहेत. रुग्णांवर ते प्रभावी ठरत असल्याची माहिती मिळत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : पतंजलीचं पहिलं कोरोना आयुर्वेदिक औषध तयार! रामदेव बाबा आज करणार लाँच

CoronaVirus News : आशेचा किरण! कोरोना हरणार, देश जिंकणार; 'ही' तीन औषधं व्हायरसला टक्कर देणार

India China Faceoff : भारताला लुबाडण्यासाठी चीनची 'नवी चाल'; 'या' आवश्यक वस्तूंचे वाढणार भाव 

ही दोस्ती तुटायची नाय! मधमाश्यांचा भन्नाट मित्र पाहिलात का?; Video पाहून हैराण व्हाल 

'काँग्रेसच्या छळामुळे एका डोळ्याची दृष्टी गेली, मेंदूला सूज आली', भाजपा खासदाराचा गंभीर आरोप

चहा विक्रेत्याच्या लेकीची कौतुकास्पद कामगिरी, फ्लाईंग ऑफिसर होऊन नेत्रदीपक भरारी

Web Title: CoronaVirus Marathi News Israel's miracle mask Sonovia expects 99% corona success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.