CoronaVirus News : अजब पाकिस्तान! सोशल डिस्टंन्सिंगचे नियम मोडले; 20 जणांना एकाच तुरुंगात डांबले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 04:50 PM2021-03-31T16:50:38+5:302021-03-31T16:58:16+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates In Pakistan : पाकिस्तानमधील फालिया शहरातून जवळपास 20 जणांना कोरोना संसर्ग टाळण्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पकडण्यात आलं आहे.

CoronaVirus Marathi News 20 people arrested for flouting corona SOPs they are packed in one cell Pakistan | CoronaVirus News : अजब पाकिस्तान! सोशल डिस्टंन्सिंगचे नियम मोडले; 20 जणांना एकाच तुरुंगात डांबले

CoronaVirus News : अजब पाकिस्तान! सोशल डिस्टंन्सिंगचे नियम मोडले; 20 जणांना एकाच तुरुंगात डांबले

Next

इस्लामाबाद - जगभरात कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे. कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. पाकिस्तानमध्ये देखील कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. इम्रान खान यांनी काही दिवसांपूर्वीच चीनची कोरोनाची लस टोचून घेतली होती. त्यानंतरही आता त्यांना कोरोनाची लागण झाली. याच दरम्यान आता एक अजब घटना समोर आली आहे. 

पाकिस्तानमधील फालिया शहरातून जवळपास 20 जणांना कोरोना संसर्ग टाळण्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पकडण्यात आलं आहे. त्यानंतर त्यांना एकाच तुरुंगात डांबण्यात आलं. विशेष म्हणजे सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचं पालन न केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. लोकांन जेलमध्ये डांबून ठेवल्याचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. पाकिस्तानी पोलिसांनी केलेल्या या कारवाईची अनेकांनी खिल्ली उडवली आहे. सोशल डिस्टंसिंगचा नियम तोडला या आरोपाखाली सर्वांना अटक करण्यात आली पण सर्व आरोपींना एकाच जेलमध्ये डांबून पोलीस कशाप्रकारे नियम पाळत आहेत असा सवाल लोकांनी विचारला आहे. 

पाकिस्तानी पत्रकार नायला इनायतने याबाबत एक ट्विट केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. पाकिस्तानमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानने 12 देशांमधील प्रवाशांना एक महिन्यांसाठी प्रवेश बंदी जाहीर केली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पाकिस्तानने हा निर्णय घेण्यात आला आहे. या देशात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांनाही हा आदेश लागू असणार आहे. प्रवेश बंदी केलेल्या देशांमध्ये दक्षिण आफ्रिका, रवांडा आणि टांझानियासह 12 देशांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानमध्ये कोरोनाचा दक्षिण आफ्रिका स्ट्रेन आढळून आला होता. पाकिस्तानमध्ये कोरोनाचे दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलचे स्ट्रेन आढळल्यानंतर नागरी विमान प्राधिकरणाने देशांची सूची जारी केली असून ए, बी, सी अशी वर्गवारी केली आहे. सी गटातील 12 देशांवर पूर्णपणे बंदी घातली आहे. या 12 देशांवर 23 मार्च ते 5 एप्रिलपर्यंत प्रवास बंदी असणार आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान कोरोना पॉझिटिव्ह; दोन दिवसांपूर्वी घेतली होती चीनची लस 

पाकिस्तानमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. एकूण कोरोना रुग्णांची संख्या 6.26 लाखांहून अधिक झाली आहे. तर 13,843 जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान इम्रान खान यांचे स्पेशल असिस्टंट फैजल सुल्तान यांनी ट्विट करून खान यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर इम्रान खान यांनी स्वत:ला आयसोलेटेड करून घेतलं असून संपर्कात आलेल्यांना कोरोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहन देखील केलं आहे. पाकिस्तानमध्ये वेगाने कोरोनाचा प्रसार होत असतानाच इम्रान खान यांनी गुरुवारी चीनच्या कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर देखील ते कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. 

Web Title: CoronaVirus Marathi News 20 people arrested for flouting corona SOPs they are packed in one cell Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.