CoronaVirus : Italy records almost 1,000 coronavirus-related deaths in one day record vrd | CoronaVirus : इटलीत एका दिवसात जवळपास 1000 जणांचा गेला जीव; मृत्यूचं तांडव थांबता थांबेना 

CoronaVirus : इटलीत एका दिवसात जवळपास 1000 जणांचा गेला जीव; मृत्यूचं तांडव थांबता थांबेना 

रोमः कोरोना व्हायरसनं जगभरात हाहाकार माजवला आहे. अमेरिका, चीन, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसनं कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाने इटलीमध्ये 970 पेक्षा जास्त लोकांचा बळी घेतला असून, पुन्हा एकदा भयानक विक्रम नोंदविला गेला आहे. जगभरात या धोकादायक विषाणूमुळे मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांमध्ये अमेरिकाही आघाडीवर आहे. इटलीनंतर स्पेनमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले असून, एका दिवसात 569 लोकांचा मृत्यू झाला. यासह येथे एकूण मृत्यूची संख्या 4,934वर गेली आहे.

दुसरीकडे महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण सर्वाधिक आहे. अमेरिकेतील कोरोनाबधितांचा  आकडा एक लाखांच्यापार पोहोचला आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 1544 जणांचा मृत्यू झाला आहे. जॉन हॅपकिंग विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात अमेरिकेत सुमारे 18 हजार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 345 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 717 एवढा झाला आहे. 

एका दिवसात 970 जणांचा मृत्यू 
ताज्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी इटलीमध्ये मृत्यूंच्या संख्येत वाढ झाली आहे. आतापर्यंत एकाच दिवसात 970 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे युरोपियन देशात मृतांचा आकडा 9,134 वर गेला आहे. तसेच 86,498 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर केवळ 10,950 लोक बरे झाले आहेत. या आठवड्यात दोनदा आकडेवारी कमी झाल्याने देशातील वैद्यकीय कर्मचारी काहीसे निश्चिंत आहेत, पण पुन्हा एकदा परिस्थिती विदारक बनली आहे. तथापि, संसर्गाचे प्रमाण मागील 8% वरून 7.4% पर्यंत खाली आले आहे.

आता गोष्टी आणखी बिघडतील
तज्ज्ञांचा अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत इटलीमध्ये कोरोना विषाणूची लागण शिगेला पोहोचेल, परंतु आणखी चार आघाडीच्या डॉक्टरांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर इटलीच्या प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे की हे संकट अद्याप संपलेले नाही. राष्ट्रीय आरोग्य संस्थांनी खबरदारीचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याचा सल्ला दिला असून,त्यानुसार इटलीतील लॉकडाऊन तीन एप्रिलपर्यंत वाढवण्यात येऊ शकतं. 

Web Title: CoronaVirus : Italy records almost 1,000 coronavirus-related deaths in one day record vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.