China Coronavirus :चीननं भारतीय तरुणाला मायदेशात परतण्यापासून रोखलं; विमानाचं तिकीट केलं रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2020 07:17 PM2020-02-08T19:17:22+5:302020-02-08T19:17:37+5:30

कोरोना व्हायरसनं चीनमध्ये हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे आतापर्यंत 722 लोक मृत्युमुखी पडले

coronavirus in india chines police not allowing person rishikesh india | China Coronavirus :चीननं भारतीय तरुणाला मायदेशात परतण्यापासून रोखलं; विमानाचं तिकीट केलं रद्द

China Coronavirus :चीननं भारतीय तरुणाला मायदेशात परतण्यापासून रोखलं; विमानाचं तिकीट केलं रद्द

Next

बीजिंग- कोरोना व्हायरसनं चीनमध्ये हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे आतापर्यंत 722 लोक मृत्युमुखी पडले असून, 34546 जणांना त्याची लागण झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर चीननंही सतर्कता बाळगली आहे. चीनमध्ये एक भारतीय तरुणही अडकून पडला आहे. त्याचे आईवडीलसुद्धा चितिंत आहेत. तो तरुण चीनमधला योग प्रशिक्षक आहे. चिनी पोलीस त्याला परत भारतात पाठवण्यास तयार नाही. तरुणाच्या आईवडिलांनी त्याला भारतात परत आणण्यासाठी उत्तराखंड विधानसभा अध्यक्षांकडे मागणी केली आहे. ऋषिकेशमध्ये वास्तव्याला असणारा तरुण चीनमध्ये शिक्षकाची नोकरी करतो.

कोरोना व्हायरसचा प्रकोप पाहता चिनी पोलिसांनी त्याला मायदेशात परत पाठवण्यास नकार दिला आहे. त्याच्या आईवडिलांनी सांगितलं की, मुलगा चीनमधल्या हेनान प्रांतातल्या नयांगमध्ये योग शिकवण्याचे कार्य करतो. गेल्या अनेक काळापासून तो चीनमध्ये राहून काम करत आहे. तो भारतात परत येत होता, त्यासाठी तिकीटसुद्धा बुक केली होती. परंतु विमानतळावर पोहोचताच चिनी पोलिसांनी त्याला जाण्यापासून मज्जाव करत रोखले. मुलगा परत  न आल्यानं आईवडिलांना त्याची चिंता सतावते आहे. मुलाला सुखरूप परत आणण्यासाठी त्याचे आई-वडील उत्तराखंड विधानसभा अध्यक्ष प्रेमचंद अग्रवाल यांच्याजवळ गेले. त्यांना आईवडिलांनी आपबिती सांगितली असून, प्रेमचंद अग्रवाल यांनी मुलाला परत आणण्याचं आश्वासन दिलं आहे.  
 

एअर इंडिया, इंडिगोसह अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी चीनला जाणारी आपली विमाने काही दिवसांसाठी रद्द केली आहेत. सध्याच्या काळात चीनला जाणे टाळा अशा सूचना भारतासह अनेक देशांनी आपापल्या नागरिकांना दिल्या आहेत. जपानच्या समुद्रात नांगरून ठेवलेल्या डायमंड प्रिन्सेस नावाच्या क्रूझमध्ये कोरोनाची लागण झालेल्या प्रवाशांची संख्या आता 61 झाली आहे. या क्रूझमधील एक प्रवासी गेल्या आठवड्यात हाँगकाँगला उतरला. त्याची तपासणी केली असता तो कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या क्रूझमधील प्रवाशांपैकी 273 जणांची आतापर्यंत तपासणी करण्यात आली आहे. क्रूझवर कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये जपान, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना आदी देशांतील नागरिकांचा समावेश आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कोरोनामुळे तब्बल 24 हजार मृत्यू; चीनी कंपनीचा डेटा लीक

चीनमध्ये कोरोनाच्या संसर्गामुळे बळींची संख्या ४९० वर; ३,२१९ रुग्णांची प्रकृती चिंताजनक

कोरोना व्हायरसमुळे Apple चं मोठं नुकसान; जाणून घ्या कसं

कोरोना विषाणूचे रुग्ण चीनसह ३१ देशांमध्ये; हाँगकाँग, फिलिपिन्समध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू

 'हे' मिश्रण प्यायल्याने होते कोरोना वायरसचे निदान; ब्रिटिश नागरिकाने केला अनोखा दावा

Web Title: coronavirus in india chines police not allowing person rishikesh india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.