Coronavirus: पन्नास टक्के बेरोजगार! महसुलात दोनशे अब्ज रॅँडची घट शक्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 11:48 PM2020-05-04T23:48:51+5:302020-05-04T23:49:09+5:30

दक्षिण आफ्रिकेत आजच्या घडीला कोरोनाबाधितांची संख्या आहे ६७८३, बरे झालेल्या रुग्णांची संख्या आहे

Coronavirus: Fifty percent unemployed! Two hundred billion rand reduction in revenue possible! | Coronavirus: पन्नास टक्के बेरोजगार! महसुलात दोनशे अब्ज रॅँडची घट शक्य!

Coronavirus: पन्नास टक्के बेरोजगार! महसुलात दोनशे अब्ज रॅँडची घट शक्य!

Next

दक्षिण आफ्रिका

‘जगातल्या बहुसंख्य देशांनी कोरोनाच्या काळात लॉकडाऊन केलेलं असल्यानं त्यांची अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. यातून लवकर बाहेर पडण्याची कुठलीही चिन्हं समोर नाहीत. दक्षिण आफ्रिकाही त्यामुळे कधी नव्हे इतका मोठ्या पेचात अडकलेला आहे. येथील जवळपास सगळेच उद्योगधंदे बंद पडल्याने बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आताच ती काही लाखांच्या घरात आहे, पण कोरोनामुळे ती आणखी वाढेल.

याबाबत दक्षिण आफ्रिकेचे कोषागार महासंचालक डोंडो मोगाजाने यांनी म्हटलं आहे, कोरोनामुळे कर महसुलात तब्बल दोनशे अब्ज रॅँडची घट तर होईलच, पण लाखो लोकांना आपला रोजगार गमवावा लागेल. बेरोजगारीचं हे प्रमाण तब्बल चाळीस टक्क्क्यांपर्यंत जाईल.
दक्षिण आफ्रिकेच्या चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅॅॅॅॅॅॅँड इंडस्ट्रीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अ‍ॅलन मुकोकी यांचं तर यापुढे जाऊन म्हणणं आहे की, कोरोना महामारी देशातील जवळपास पन्नास टक्के लोकांचा रोजगार हिसकावून घेईल. आतापर्यंत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असल्या, तरी अनेकांचं फक्त पगार कपातीवर भागलं आहे, पण यापुढच्या काळात आणखी लाखो नोकºया गेल्याचं देशाला आणि देशातील जनतेला पाहावं लागेल.

कारण देशातील उद्योगधंद्यांकडेही आपले उद्योग चालू ठेवण्यासाठी पैसे नाहीत. आधीच त्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यात केवळ कर्मचाऱ्यांच्या पगारावरच इतका पैसा त्यांनी खर्च केला आणि खर्च करावा लागला, तर या बिकट आर्थिक संकटातून त्या कधीच उभ्या राहू शकणार नाहीत. त्यामुळे ज्यांची सेवा अपरिहार्य आणि अत्यावश्यक नाही, अशा सगळ्या कामगारांच्या नोकºयांवर यापुढे गदा येणार. कर्मचाºयांच्या पगारावरचा खर्च त्यांनी कमी केला नाही, तर त्यांच्याही अस्तित्वाचा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत आम्हालाही जे भविष्य दिसतं आहे, ते म्हणजे, येत्या काळात सगळेच उद्योगधंदे अगदी सावध पावलं टाकतील. मोठ्या प्रमाणात कर्जे घेणार नाहीत. लोकांना कामावरून काढतील आणि त्यांचे पगारही कमी करतील. अशावेळी सगळा भार येईल, तोही ‘अनएम्प्लॉयमेंट इन्शुरन्स फंडा’वर. त्यामुळे त्यांचंही कंबरडं मोडेल.

दक्षिण आफ्रिकेत आजच्या घडीला कोरोनाबाधितांची संख्या आहे ६७८३, बरे झालेल्या रुग्णांची संख्या आहे २५४९ आणि आजवर मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आहे १३१. अर्थात कोरोनाबाधितांची संख्या यापेक्षा खूपच मोठी असण्याची शक्यता आहे आणि मृतांचा आकडाही फसवा असण्याची शक्यता आहे. कारण लक्षावधी लोकांची तपासणीच झालेली नाही. प्रशासनालाही हे चांगलंच माहीत आहे. त्यामुळे सगळया बाजूंनी अंगावर आलेल्या या संकटाशी कसं लढायचं, असा मोठाच प्रश्न दक्षिण आफ्रिकेसमोर उभा ठाकला आहे.

Web Title: Coronavirus: Fifty percent unemployed! Two hundred billion rand reduction in revenue possible!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.