CoronaVirus: अल्फा, बीटा, गॅमा भारतातून गायब! पण डेल्टा व्हेरिअंट चिंता वाढवतोय, शास्त्रज्ञांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 08:15 AM2021-11-12T08:15:09+5:302021-11-12T11:20:26+5:30

CoronaVirus in India: नवी दिल्लीच्या इंस्टीट्यूट ऑफ जीनोमिक्स एंड इंटिग्रेटिव बायोलॉजी (आईजीआईबी) चे संचालक डॉ. अनुराग अग्रवाल यांच्या नुसार डेल्टा व्हायरस महामारी पुन्हा फैलावण्याची ताकद ठेवतो. भारतातील दुसरी लाट याचाच परिणाम होती. कोरोना लस घेतलेल्या व्यक्तींनाही डेल्टाने संक्रमित केले होते. 

CoronaVirus: Fifth wave in France, fourth wave in Germany! Delta virus raises concerns | CoronaVirus: अल्फा, बीटा, गॅमा भारतातून गायब! पण डेल्टा व्हेरिअंट चिंता वाढवतोय, शास्त्रज्ञांचा इशारा

CoronaVirus: अल्फा, बीटा, गॅमा भारतातून गायब! पण डेल्टा व्हेरिअंट चिंता वाढवतोय, शास्त्रज्ञांचा इशारा

googlenewsNext

कोरोना महामारीबाबत भारताला दिलासा मिळालेला आहे. कारण कोरोना व्हायरसचे दुसरे म्युटेशन गायब होऊ लागले आहेत. मात्र, पुन्हा संक्रमित करणारा डेल्टा किंवा त्याच्याशी संबंधीत झालेले अन्य म्युटेशन चिंतेचा विषय बनले आहेत. इंडियन सार्स-कोव-2 जीनोमिक्स कंसोर्टियम (इन्साकॉग) ने गुरुवारी एक रिपोर्ट जारी केला, त्यानुसार 1,15,101 सॅम्पलचे जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात यश आल्याचे म्हटले आहे. 

यामध्ये 45,394 मध्ये गंभीर श्रेणीतील म्युटेशन मिळाले आहेत. 41 हजार नमुन्यांमध्ये डेल्टा आणि डेल्टा प्लस सारखे खतरनाक म्युटेशन दिसले आहेत. 28,820 मध्ये डेल्टा, 5,450 मध्ये डेल्टा प्लस आणि 6,611 मध्ये एवाय श्रेणीचे म्युटेशन मिळाले आहेत. इन्साकॉगने सांगितले की, देशात व्हायरसचे दुसरे म्युटेशन कमजोर होऊ लागले आहेत. गामा सारखे म्युटेशन तर सापडतच नाहीएत. कोरोना व्हायरसचे दुसरे कोणतेही मोठे म्युटेशन न झाल्याची माहिती देण्यात आली आहे. 

नवी दिल्लीच्या इंस्टीट्यूट ऑफ जीनोमिक्स एंड इंटिग्रेटिव बायोलॉजी (आईजीआईबी) चे संचालक डॉ. अनुराग अग्रवाल यांच्या नुसार डेल्टा व्हायरस महामारी पुन्हा फैलावण्याची ताकद ठेवतो. भारतातील दुसरी लाट याचाच परिणाम होती. कोरोना लस घेतलेल्या व्यक्तींनाही डेल्टाने संक्रमित केले होते. 

फ्रान्समध्ये हाहाकार

रशियानंतर आता फ्रान्समध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. ब्रिटन, रशिया आणि जर्मनीनंतर तिथे लाट येऊ लागली आहे. फ्रान्सचे आरोग्य मंत्री ऑलिवर वेरन यांनी सांगितले की, पाचव्या लाटेची सुरुवात झाली आहे. दुसरीकडे रशियामध्ये 83 टक्के हॉस्पिटलमधील बेड भरलेले आहेत. तसेच 12 क्षेत्रांतील काही हॉस्पिटलमध्ये केवळ दोन ते तीन दिवसांचाच ऑक्सिजन उरला आहे. तर जर्मनीमध्ये चौथी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

Web Title: CoronaVirus: Fifth wave in France, fourth wave in Germany! Delta virus raises concerns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.