coronavirus: कोरोनाच्या संसर्गाची भीती वाढली, भाराताच्या या शेजारी देशात प्रथमच संपूर्ण लॉकडानऊनची घोषणा झाली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 06:08 PM2020-08-13T18:08:23+5:302020-08-13T18:49:45+5:30

भारताशेजारील काही देश आतापर्यंत कोरोनाच्या प्रकोपासून सुरक्षित राहिले होते. पण आता या देशांमध्येही कोरोना विषाणूने घुसखोरी केली आहे.

coronavirus: Fear of coronavirus rises, first lockdown announced in Bhutan | coronavirus: कोरोनाच्या संसर्गाची भीती वाढली, भाराताच्या या शेजारी देशात प्रथमच संपूर्ण लॉकडानऊनची घोषणा झाली

coronavirus: कोरोनाच्या संसर्गाची भीती वाढली, भाराताच्या या शेजारी देशात प्रथमच संपूर्ण लॉकडानऊनची घोषणा झाली

Next

थिम्पू - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या भारतात गंभीर संकट उभे राहिले आहे. मात्र अशा परिस्थितीतही भारताशेजारील काही देश आतापर्यंत कोरोनाच्या प्रकोपासून सुरक्षित राहिले होते. पण आता या देशांमध्येही कोरोना विषाणूने घुसखोरी केली आहे. भारताचा पूर्वोत्तर भागातील शेजारी असलेल्या भूतानमध्ये कोरोनाच्या संसर्गाची भीती वाढली असून, खबरदारीचा उपाय म्हणून देशात प्रथमच देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा झाली आहे.

कुवेतमधून भूतानमध्ये आलेल्या एका महिलेकडून करण्यात आलेल्या प्रवासामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता विचारात घेऊन हे लॉकडाऊन करण्यात आले आहे. भूतान सरकारने देशातील सुमारे ७५ लाख नागरिकांना घरातच थांबण्याचे आदेश दिले आहेत. तसेच देशातील सर्व शाळा, कार्यालये आणि व्यावसायिक संस्था बंद करण्यात आल्या आहेत.

सरकारने दिलेल्या माहितीनुसार देशातील हे लॉकडाऊन ५ ते २१ दिवसांसाठी संसर्ग झालेल्या व्यक्तींची ओळख पटवून त्यांचे विलगीकरण करण्यासाठी लागू करण्यात आले आहे. लॉकडाऊनचा उद्देश संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आहे. दरम्यान, कुवेतमधून आलेली महिला अलगीकरणानंतर करण्यात आलेल्या तपासामध्ये संसर्गमुक्त असल्याचे दिसून आले आहे.

आयसोलेशन केंद्रातून सुट्टी देण्यात आल्यानंतर आणि सोमवारी कोविड चाचणीत संसर्गाची पुष्टी होईपर्यंत या महिलेने भूतानमधील अनेक ठिकाणी प्रवास केला होता. भूतान हा मुख्यत्वेकरून पर्यटनावर अवलंबून असलेला देश आहे. मात्र कोरोनाचा संसर्ग झालेल्या एका अमेरिकी प्रवाशाला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर मार्च महिन्यापासून भूतानने परदेशी प्रवाशांसाठी देशाची सीमा बंद केली होती. दरम्यान, भूतानमध्ये एका रुग्णाशिवाय इतर रुग्ण हे आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलेले प्रवासी होते.

इतर महत्त्वाच्या बातम्या

ताशी १८० किमी वेग, उशीर झाल्यास नुकसान भरपाई; अशा असतील देशातील खासगी ट्रेनमधील सुविधा

केवळ ३८ जणांवर चाचणी, अनेक साइड इफेक्ट्स, असं आहे रशियाच्या कोरोनावरील लसीचं वास्तव

आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता

वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती

रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर स्वस्तात सोने खरेदीची संधी, मोदी सरकारच्या या योजनेमुळे होणार सर्वसामान्यांची चांदी

टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

Web Title: coronavirus: Fear of coronavirus rises, first lockdown announced in Bhutan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.