CoronaVirus News: इटलीत डॉक्टर, नर्स यांना होतोय मानसिक त्रास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 02:46 AM2020-06-16T02:46:18+5:302020-06-16T02:46:34+5:30

‘कोविड फायटर’ना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची अनेक प्रकरणे समोर

CoronaVirus Doctors and nurses in Italy are suffering from mental illness | CoronaVirus News: इटलीत डॉक्टर, नर्स यांना होतोय मानसिक त्रास

CoronaVirus News: इटलीत डॉक्टर, नर्स यांना होतोय मानसिक त्रास

Next

मिलान : इटलीत कोरोना विषाणूने कहर केला असताना तेथील डॉक्टर, नर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आपले सर्वस्व पणाला लावत देशाला वाचविले. यामुळेच हा देश महामारीवर नियंत्रण मिळवू शकला. आता मात्र, या ‘कोविड फायटर’ना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

इटलीत लोम्बार्डी भागात संसर्ग खूप जास्त होता. तेथील वैद्यकीय विभागातील सर्वांनी दिवसरात्र मेहनत करून या रोगावर नियंत्रण मिळविले. येथील एक कर्मचारी आपल्या अवस्थेबाबत म्हणाला, ‘‘संकटकाळात अनुभवलेल्या वातावरणाच्या परिणामामुळे सध्या माझी चिडचिड खूप वाढली आहे. अनेकांशी भांडण होत आहे.’’

Web Title: CoronaVirus Doctors and nurses in Italy are suffering from mental illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.