coronavirus death 51 doctors fighting against corona in italy death toll crossed 10000 | Coronavirus : इटलीत परिस्थिती गंभीर! कोरोनाशी लढणाऱ्या 51 डॉक्टरांना गमवावा लागला जीव

Coronavirus : इटलीत परिस्थिती गंभीर! कोरोनाशी लढणाऱ्या 51 डॉक्टरांना गमवावा लागला जीव

कोरोना व्हायरसचा संपूर्ण जगात हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाने जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. जगभरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यत 30,879 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 6,64,941 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 1,42,450 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. इटलीत कोरोनामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. इटलीत 10,000 हून अधिक लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

कोरोनापासून रुग्णांचा बचाव करता यावा यासाठी सर्वच वैद्यकीय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहे. डॉक्टर आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी तत्पर असलेले पाहायला मिळत आहे. मात्र कोरोनाच्या या लढाईत इटलीतील तब्बल 51 डॉक्टरांना आपला जीव गमवावा लागल्याची माहिती समोर आली आहे. इटलीत अनेक डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 7100 हून अधिक डॉक्टर, नर्स आणि अन्य कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. जे कर्मचारी बरे होत आहेत त्यांना घरी पाठवले जात आहे आणि त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर पुन्हा कामावर बोलवले जात असल्याची माहिती मिळत आहे.

युरोपीयन देशांमध्ये कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. इटली, ब्रिटन, स्पेन, जर्मनी सारख्या देशांमध्ये कोरोनाचा धोका प्रचंड वाढला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यातच आता कोरोनामुळे इटलीमध्ये 10,000 लोकांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  इटलीत 92,472 लोकांना कोरोनाची लागण झाली असून 10,023 लोकांचा मृत्यू झाला आहे. याआधी शुक्रवारी कोरोनामुळे एकाच दिवसात 970 जणांचा इटलीमध्ये मृत्यू झाला होता.

Coronavirus: 10,000 people have died due to the Corona virus in Italy mac | Coronavirus: इटलीत कोरोनाचा हाहाकार; मृतांचा आकडा १० हजारांवर

महासत्ता म्हणून ओळख असणाऱ्या अमेरिकेचे देखील कोरोनाने कंबरडे मोडले आहे. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या ट्रॅकरनुसार अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या 1 लाखांहून अधिक झाली आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूचा प्रसार किती वेगाने होत आहे याचा अंदाज लावला जाऊ शकतो, गेल्या 24 तासांत तब्बल 18 हजार नवीन प्रकरणे समोर आली आहेत. तर, 345 लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 900 वर पोहोचली आहे. तर 20 जणांचा मृत्यू झाला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : कंपनी असावी तर अशी! एप्रिलमध्ये 'या' कर्मचाऱ्यांना मिळणार 25 टक्के जास्त पगार

Coronavirus : त्यांचा तो प्रवास ठरला अखेरचा, गावाकडे निघालेल्या 13 जणांचा मृत्यू

Coronavirus : धक्कादायक! दारुची दुकानं बंद असल्याने 5 जणांची आत्महत्या

Coronavirus : लॉकडाऊनचे तीन तेरा! खरेदीसाठी नागरिकांची झुंबड

 

Web Title: coronavirus death 51 doctors fighting against corona in italy death toll crossed 10000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.