coronavirus: ब्राझीलमधील कोरोनाचा स्ट्रेन भारतापेक्षा धोकादायक, महिनाभरात घेतला एक लाख लोकांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 11:38 AM2021-04-30T11:38:51+5:302021-04-30T11:40:48+5:30

coronavirus News : अमेरिका, भारत आणि ब्राझील या तीन देशांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. दरम्यान, सध्या भारत आणि ब्राझीलमध्ये कोरोनाचा कहर दिसून येत आहे.

coronavirus: Corona strain in Brazil more dangerous than Indian Corona strain , kills one lakh people in a month | coronavirus: ब्राझीलमधील कोरोनाचा स्ट्रेन भारतापेक्षा धोकादायक, महिनाभरात घेतला एक लाख लोकांचा बळी

coronavirus: ब्राझीलमधील कोरोनाचा स्ट्रेन भारतापेक्षा धोकादायक, महिनाभरात घेतला एक लाख लोकांचा बळी

googlenewsNext
ठळक मुद्देब्राझीलमध्ये गेल्या महिनाभरात कोरोना विषाणूमुळे १ लाख रुग्णांचा मृत्यूया भयानक मृत्यूदरामुळे ब्राझीलमध्ये दहशतीचे वातावरण ब्राझीलमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा चार लाखांच्या पार पोहोचला आहे

साओ पावले - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे जगभरात भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे. (coronavirus) जवळपास दीड वर्ष उलटत आले तरी जगातील अनेक भागात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आलेला नाही. अमेरिका, भारत आणि ब्राझील या तीन देशांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. दरम्यान, सध्या भारत आणि ब्राझीलमध्ये कोरोनाचा कहर दिसून येत आहे. त्यातच कोरोनाच्या भारतात सापडलेल्या स्ट्रेनपेक्षा कोरोनाचा ब्राझीलमधील स्ट्रेन अधिक धोकादायक असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यामुळे गेल्या महिनाभरात ब्राझीलमध्ये सुमारे १ लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.  (Corona strain in Brazil more dangerous than Indian Corona strain , kills one lakh people in a month)

ब्राझीलमध्ये गेल्या महिनाभरात कोरोना विषाणूमुळे १ लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या भयानक मृत्यूदरामुळे ब्राझीलमध्ये दहशतीचे वातावरण आहे. दक्षिण अमेरिकेतील या देशात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा चार लाखांच्या पार पोहोचला आहे. कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशांच्या यादीत ब्राझील जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता काही आरोग्य तज्ज्ञांकडून देशातील परिस्थिती अजून बिघडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

ब्राझीलमध्ये दररोज सरासरी २ हजार ४०० रुग्णांचा मृत्यू होत आहे. गुरुवारी ब्राझीलमध्ये ३ हजार १ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे देशातील मृतांची संख्या ४ लाख १ हजार १८६ वर पोहोचली आहे. स्थानिक आरोग्य तज्ज्ञांनी कोरोनाच्या संसर्गाचे रुग्ण आणि मृतांची संख्या घटल्याने काहीसा सुटकेचा निश्वास घेतला आहे. मात्र त्यांना युरोपप्रमाणेच कोरोनाची अजून एक लाट येण्याची भीती वाटत आहे. दरम्यान, एका संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार ब्राझीलमध्ये आतापर्यंत ६ टक्क्यांहून कमी नागरिकांचे लसीकरण झाले आहे.  

दरम्यान, ब्राझीलचे राष्ट्रपती जेयर बोलसोनारो यांनी आपण सर्वात शेवटी लसीचा डोस घेणार असल्याचे सांगितले. तसेच कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी निर्बंध लागू केल्याने त्यांनी देशभरातील महापौर आणि गव्हनर्सवर टीका केली. 

Web Title: coronavirus: Corona strain in Brazil more dangerous than Indian Corona strain , kills one lakh people in a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.