Coronavirus: जबरदस्त! घरात कोणी कोरोना संक्रमित असेल तर १५ मिनिटांत वाजणार अलार्म; संशोधकांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 08:09 PM2021-06-13T20:09:15+5:302021-06-13T20:11:06+5:30

वैज्ञानिकांना चाचणी दरम्यान आढळलं की, या उपकरणाचा निष्कर्ष जवळपास ९८-१०० टक्क्यांपर्यंत निगडीत आहे.

Coronavirus: Corona ceiling alarm developed that can detect virus in a room | Coronavirus: जबरदस्त! घरात कोणी कोरोना संक्रमित असेल तर १५ मिनिटांत वाजणार अलार्म; संशोधकांचा दावा

Coronavirus: जबरदस्त! घरात कोणी कोरोना संक्रमित असेल तर १५ मिनिटांत वाजणार अलार्म; संशोधकांचा दावा

Next
ठळक मुद्देसध्या हे प्राथमिक चाचणीचे परिणाम आहेत. यावर आणखी अभ्यास करून पेपरमध्ये रिपोर्ट प्रकाशित केला जाईल. स्कूल ऑफ हायजिन एन्ड ट्रॉपिकल मेडिसिन आणि डरहम यूनिवर्सिटीच्या वैज्ञानिकांद्वारे रिसर्च केले त्याचे सकारात्मक परिणाम डिटेक्टरद्वारे कोरोना संक्रमित लोकांना शोधलं जाऊ शकतं. संक्रमित व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणं दिसू अथवा नको मशिन प्रभावीपणे काम करते

संपूर्ण जग सध्या कोरोना महामारीच्या संकटाचा सामना करत आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळं लाखो लोकांनी जीव गमावला आहे. कोट्यवधी लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले. कोरोना महामारीपासून वाचण्यासाठी जगभरातील संशोधक दिवसरात्र मेहनत घेऊन संशोधन करत आहेत. वैज्ञानिकांनी कोरोनावर लस विकसित केली आहे. आता ब्रिटीश वैज्ञानिकांनी दावा केलाय की, त्यांनी सीलिंग माऊंटेड कोविड अलार्म विकसित केला आहे. जो कोणत्याही रूममध्ये कोरोना संक्रमित व्यक्तीचा शोध अवघ्या १५ मिनिटांत घेऊ शकतो.

द संडे टाइम्सच्या रिपोर्टनुसार, कोरोना संक्रमित रुग्णाची अत्याधुनिक पद्धतीने माहिती देणारं उपकरण विमानाच्या कॅबिनमध्ये, केअर सेंटरमध्ये, घरात आणि कार्यालयात स्क्रीनिंग करण्यासाठी लावता येईल. हे उपकरण आकाराने स्मोक अलार्मपेक्षा थोडं मोठं आहे. लंडन स्कूल ऑफ हायजिन एन्ड ट्रॉपिकल मेडिसिन आणि डरहम यूनिवर्सिटीच्या वैज्ञानिकांद्वारे रिसर्च केले त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.

वैज्ञानिकांना चाचणी दरम्यान आढळलं की, या उपकरणाचा निष्कर्ष जवळपास ९८-१०० टक्क्यांपर्यंत निगडीत आहे. पीसीआर लॅब आधारित कोविड १९ चाचणी आणि अँन्टिजेन चाचणीच्या तुलनेत अधिक जवळ कोरोना संक्रमितांबद्दल माहिती देते. सध्या हे प्राथमिक चाचणीचे परिणाम आहेत. यावर आणखी अभ्यास करून पेपरमध्ये रिपोर्ट प्रकाशित केला जाईल. कॅब्रिजशायर फर्म रोबोसायन्टिफिकद्वारे हा सेंसर बनवण्यात आला आहे. त्वचाद्वारे निर्माण होणाऱ्या रसायनाच्या आधारे संक्रमितांची ओळख पटवतं.

कोरोना व्हायरसनं संक्रमित लोकांच्या श्वास घेताना उपलब्ध असणाऱ्या रसायनची चाचणी करून त्याचे परिणाम समोर येतात. हे सेंसर ‘अस्थिर सेंद्रीय संयुगे" मानवी नाकाला वास घेण्याकरिता गंध देखील सूक्ष्म तयार करतात. कोविड अलार्मच्या संशोधन पथकाच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की काही कुत्र्यांद्वारेही संक्रमित व्यक्तीला ओळखता येते. परंतु अलार्मचा निष्कर्ष रिपोर्टच्या अगदी जवळ जाणारा आहे. संडे टाइम्सच्या वृत्तानुसार, डिटेक्टरद्वारे कोरोना संक्रमित लोकांना शोधलं जाऊ शकतं. संक्रमित व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणं दिसू अथवा नको मशिन प्रभावीपणे काम करते असा दावा संशोधकांनी केला आहे.

Web Title: Coronavirus: Corona ceiling alarm developed that can detect virus in a room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.