...तर चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढेल; नवीन स्टडीमध्ये दिला मोठा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 10:13 PM2021-11-28T22:13:37+5:302021-11-28T22:19:07+5:30

Coronavirus : पेकिंग विद्यापीठातील चार गणितज्ज्ञांनी म्हटले आहे की, प्रभावी लसीकरण आणि विशेष उपचारांशिवाय चीन सर्व प्रवाशांसाठी आयसोलेशनची व्यवस्था करण्यास तयार नाही.

Coronavirus : China study warns of 'colossal' COVID outbreak if it opens up like U.S., France | ...तर चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढेल; नवीन स्टडीमध्ये दिला मोठा इशारा

...तर चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढेल; नवीन स्टडीमध्ये दिला मोठा इशारा

Next

बिजिंग : कोरोनाच्या (Coronavirus) नवीन व्हेरिएंटमुळे चिंता वाढली आहे. या व्हेरिएंटमुळे चीनचा (China) बहुतांश भाग इतर देशांतील प्रवाशांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. याचे कारण एका नवीन स्टडीमध्ये देण्यात आलेला दिलेला इशारा आहे. यामध्ये जर निर्बंध हटवले गेले तर चीनला महामारीच्या 'भयानक उद्रेका'चा सामना करावा लागेल. चीनमध्ये दररोज 6.30 लाखांहून अधिक संसर्गाची प्रकरणे नोंदवली जाऊ शकतात, म्हटले आहे.

पेकिंग विद्यापीठातील गणितज्ज्ञांनी दिलेल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, जर चीनने इतर देशांप्रमाणे प्रवासी बंदी उठवली आणि कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा प्रसार करण्यासाठी शून्य सहनशीलतेचा दृष्टिकोन सोडला तर देशात दररोज 6,30,000 हून अधिक प्रकरणे समोर येऊ शकतात. तसेच, सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, कोरोना तीव्र उद्रेक होण्याची शक्यता आहे, याला वैद्यकीय यंत्रणा समर्थन देऊ शकत नाही, असेही रिपोर्टमध्ये म्हटले आहे. 

चीनमध्ये शनिवारी कोरोची 23 नवीन प्रकरणे समोर आली, त्यापैकी 20 प्रकरणे इतर देशांतून आली आणि बीजिंगसह इतर शहरांमध्ये संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. जगातील पहिला कोरोनाचा रुग्ण चीनमधील वुहान शहरात आढळला होता. यांनतर संपूर्ण जगात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगानुसार, चीनमध्ये आतापर्यंत कोरोनाचे 98,631 रुग्ण आढळले आहेत, तर 4,636 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 785 रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, चीनच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने चायना सीडीसी साप्ताहिकात प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, पेकिंग विद्यापीठातील चार गणितज्ज्ञांनी म्हटले आहे की, प्रभावी लसीकरण आणि विशेष उपचारांशिवाय चीन सर्व प्रवाशांसाठी आयसोलेशनची व्यवस्था करण्यास तयार नाही.

सध्या परदेशातून चीनमध्ये येणाऱ्यांना 21 दिवस नियुक्त हॉटेल्समध्ये आयसोलेशनमध्ये राहावे लागते. ऑगस्टपासून अमेरिका, ब्रिटन, इस्रायल, स्पेन आणि फ्रान्समधील डेटाचे विश्लेषण करून, शास्त्रज्ञांनी चीनने या देशांप्रमाणे धोरण स्वीकारल्यास काय परिणाम होतील याचे मूल्यांकन करण्याचा प्रयत्न केला. ऑगस्टमध्ये या सर्व देशांमध्ये लसीकरणाचे प्रमाण चीनपेक्षा जास्त होते. शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की जर चीननेही महामारीचा सामना करण्यासाठी अमेरिकेची रणनीती अवलंबली तर दैनंदिन प्रकरणांची संख्या 6,37,155 असू शकते, तर ऑगस्टमध्ये 1,50,098 प्रकरणे दररोज येत होती.

Web Title: Coronavirus : China study warns of 'colossal' COVID outbreak if it opens up like U.S., France

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.