CoronaVirus सात देशांमध्ये कोरोनाचे ६४ हजार बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 06:32 AM2020-04-08T06:32:51+5:302020-04-08T06:34:00+5:30

लॉकडाउनच्या कालावधीतही मुंबईत कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. मागील २४ तासांत शहर-उपनगरात १०० कोरोना रु ग्ण आढळून आले आहेत.

Corona Virus's 64000 deaths in only in seven countries | CoronaVirus सात देशांमध्ये कोरोनाचे ६४ हजार बळी

CoronaVirus सात देशांमध्ये कोरोनाचे ६४ हजार बळी

googlenewsNext

नवी दिल्ली : जगात कोरोना बाधितांची संख्या १३ लाख, ७८ हजार,५२७ वर गेली असून आतापर्यंत या आजाराने ७८ हजार, ११० जणांचा बळी घेतला आहे.
आजच्या घडीला सर्वाधिक म्हणजे ३ लाख, ७७ हजार, ५०० एवढे कोरोनाचे रुग्ण एकट्या अमेरिकेत असून गेल्या २४ तासांत तिथे ११ हजार नव्या रुग्णांची भर पडली आहे. अमेरिकेत मृतांची संख्यादेखील वाढत असून मंगळवारी रात्रीपर्यंत आकडा ११ हजार, ८०० वर गेला. इटलीमध्ये मृतांची संख्या १६ हजार, ५२३ तर स्पेनमध्ये १३ हजार, ८०० वर गेली आहे. फ्रान्समध्ये आतापर्यंत ८ हजार, ९०० तर ब्रिटनमध्ये ६ हजार, १६० जण मरण पावले आहेत. इराण आणि चीन या दोन देशांमध्ये मिळून मृतांचा आकडा सुमारे ७ हजार झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत जे ७८ हजार लोकं मरण पावले त्यापैकी ६४ हजार जण या सात देशांमधीलच आहेत. मात्र, आतापर्यंत सुमारे तीन लाख रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत.

मुंबईत २४ तासांत १०० रु ग्ण वाढले

मुंबई : लॉकडाउनच्या कालावधीतही मुंबईत कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. मागील २४ तासांत शहर-उपनगरात १०० कोरोना रु ग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण रु ग्णांची संख्या मंगळवारी ६४२ वर पोहोचली. तर सहा मृत्यूंची नोंद झाली असून एकूण बळींची संख्या ४० झाली आहे.
शहर-उपनगरातील १०० कोरोना रुग्णांपैकी ५५ रुग्ण प्रतिबंधात्मक क्षेत्रातील सहवासितांमध्ये मुंबई महापालिकेने घरोघरी जाऊन राबवलेल्या शोध मोहिमेमुळे, रुग्ण शोध क्लिनिक व संशयितांची योग्य वेळेस चाचणी केल्यामुळे सापडले आहेत. या सर्व सहवासितांची चाचणी करून त्यांचे विलगीकरण व उपचार सुरू करण्यात आले आहेत.
आता पालिकेने कोविड क्लिनिक सुरू केले असून शोध, तपासणी व उपचार या त्रिसूत्रींद्वारे वेगाने संशयित, सहवासितांचा शोध घेतला जात आहे.
१८५ संशयितांचे नमुने : प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये संशयित कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी विशेष क्लिनिक सुरु करण्यात आले आहे. त्यासाठी डॉक्टर, परिचारिका व प्रयोगशाळा तंत्रज्ञ नेमण्यात आले आहेत. सोमवारपर्यंत २० क्लिनिक सुरू करण्यात आले. त्यात ६१४ पैकी १८५ संशियतांचे नमुने घेण्यात आले.

Web Title: Corona Virus's 64000 deaths in only in seven countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.