Corona Vaccine : "कोरोना लस घ्या नाहीतर जेलमध्ये जा"; 'या' देशाच्या राष्ट्रपतींची नागरिकांना धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 05:25 PM2021-06-22T17:25:22+5:302021-06-22T17:34:50+5:30

Corona Vaccine : कोरोना लस न घेणाऱ्या नागरिकांना तुरुंगात पाठवणार असल्याची धमकी दिली आहे. 

Corona Vaccine philippine president rodrigo duterte threatened to send jail for refusing coronavirus vaccine | Corona Vaccine : "कोरोना लस घ्या नाहीतर जेलमध्ये जा"; 'या' देशाच्या राष्ट्रपतींची नागरिकांना धमकी

Corona Vaccine : "कोरोना लस घ्या नाहीतर जेलमध्ये जा"; 'या' देशाच्या राष्ट्रपतींची नागरिकांना धमकी

Next

जगभरात वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातवरण निर्माण झाले आहे. अनेक प्रगत देश हे कोरोनापुढे हतबल झाले आहेत. काही ठिकाणी रुग्णसंख्या वाढत असल्याने पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. याच दरम्यान अनेक देशात कोरोना लसीकरण सुरू आहे. कोरोना लसीकरणासाठी जनजागृती केली जात आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे फिलीपाइन्सचे राष्ट्रपती रोड्रिगो दुतेर्ते यांनी कोरोना लस न घेणाऱ्या नागरिकांना तुरुंगात पाठवणार असल्याची धमकी दिली आहे. 

फिलीपाईन्समध्ये डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग वेगाने होत आहे. फिलीपाईन्समध्ये याबाबत अलर्टही जारी करण्यात आला आहे. सोमवारी रात्री दुतेर्ते यांनी आपल्या भाषणात लोकांसमोर आता दोन पर्याय आहेत. एक तर लस घ्या अथवा तुम्हाला मी तुरुंगात पाठवणार. तुम्हाला काय हवंय याची निवड तुम्हीच करायची आहे असं म्हटलं आहे. फिलीपाईन्समध्ये मार्च महिन्यात कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले होते. मात्र फारच कमी प्रमाणात नागरीक लस घेत असल्याचे वृत्त समोर आले. लोकांना फायजरची लस मिळण्यास अडचणी येत असल्याची चर्चा आहे. कोरोना लस न घेणाऱ्या मुर्खांमुळे चिडलो असल्याचं राष्ट्रपती दुतेर्ते यांनी म्हटलं आहे. 

फिलीपाईन्समध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यावेळी लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांना गोळी मारण्याचे आदेश दुतेर्ते यांनी दिले होते. त्यानंतर लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या काही नागरिकांवर सुरक्षा दलाच्या जवानांनी गोळीबार केल्याची घटना समोर आली होती. कोरोना लशीसाठी दुतेर्ते यांनी अमेरिकेलाही धमकी दिली होती. अमेरिकेने कोरोना लसीचा पुरवठा न केल्यास त्यांच्यासोबतचा लष्करी करार रद्द करणार असल्याची धमकी दिली होती. फिलीपाईन्समधील एकूण लोकसंख्या ही 11 कोटी आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

बापरे! कोरोना लस न घेतल्यास बंद होणार सिमकार्ड; 'या' देशाने घेतला महत्त्वाचा निर्णय

लसीबाबत नागरिकांच्या मनातील संकोच दूर करण्यासाठी पाकिस्तानच्या पंजाब सरकारने अनोखं पाऊल उचललं आहे. लस न घेणाऱ्यांचे सिमकार्ड ब्लॉक केले जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्यमंत्री डॉ. यास्मीन राशिद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाचे उद्दीष्ट हे शक्य तितक्या लोकांचं लसीकरण करणं हा आहे. "राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरणामुळे कोरोना प्रकरणांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. मात्र, प्राथमिक आरोग्य विभागाचा संकलित अहवाल पंजाब प्रांतात लसीकरणाची टक्केवारी कमी आहे. लसीचा पहिला डोस घेणाऱ्या 3 ते 4 लाख लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही. पाकिस्तानमध्ये 2 फेब्रुवारीपासून मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू झाली आहे" असंही म्हटलं आहे. 

Web Title: Corona Vaccine philippine president rodrigo duterte threatened to send jail for refusing coronavirus vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.