corona infected patients crossed 10 crore in world over 21 lakh people died | कोरोनाचा विळखा! जगभरातील रुग्णांची संख्या 10 कोटींवर, 21 लाख लोकांचा मृत्यू; धडकी भरवणारी आकडेवारी

कोरोनाचा विळखा! जगभरातील रुग्णांची संख्या 10 कोटींवर, 21 लाख लोकांचा मृत्यू; धडकी भरवणारी आकडेवारी

कोरोना व्हायरसने जगाला विळखा घातला आहे. देशासह जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,06,89,527 वर गेला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 12,689 नवे रुग्ण आढळेल आहेत. तर 137 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,53,724 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दुसरीकडे जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. जगात कोरोनाच्या रुग्णसंख्येने तब्बल 10 कोटींचा टप्पा पार केला आहे. एकूण रुग्णांची संख्या 100,968,675 वर पोहोचली आहे. 

कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल 2,170,768 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 72,992,7445 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिकेसारखा प्रगत देशही कोरोनासमोर हतबल झाला आहे. 

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच प्रशासनाची चिंताही वाढली आहे. रशिया, ब्रिटन, फ्रान्स, स्पेन, इटली, तुर्की, जर्मनी आणि कोलंबियासारख्या देशांमधील कोरोना रुग्णांची संख्या ही 20 लाखांहून अधिक आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. अनेक देशांमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम आयसोलेशन, क्वारंटाईनच्या माध्यमातून योग्य ती काळजी घेतली जात आहे. तसेच कठोर नियम देखील लागू करण्यात आले आहेत. 

परिस्थिती गंभीर! "या" देशात कोरोना बळींची संख्या एक लाखावर, पंतप्रधानांनी स्वीकारली जबाबदारी

ब्रिटनमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग वेगाने होत असून रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. याच दरम्यान कोरोना बळींची संख्या ही एक लाखांहून अधिक झाली आहे. मंगळवारी ब्रिटनमध्ये मृतांच्या संख्येने एक लाखांचा टप्पा पार केला आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी या गंभीर परिस्थितीची जबाबदारी स्विकारत दु:ख व्यक्त केलं आहे. याची संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारत असल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी याची संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारत आहे. कोरोना व्हायरसने झालेल्या मृत्यूमुळे मला खूप दु:ख झालं आहे. मृतांच्या कुटुंबीयांसोबत संवेदना व्यक्त करत असल्याचं म्हटलं आहे. कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी आमच्या सरकारने, मंत्र्यांनी सर्वोतोपरी प्रयत्न केले. या महामारीचा विचार करण्यासाठी आणि सुधारण्यासाठी एक संधी आहे. लसीकरणानंतर रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाली असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: corona infected patients crossed 10 crore in world over 21 lakh people died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.