The city of Venice is in full swing | व्हेनिस शहराला पुराचा तडाखा

व्हेनिस शहराला पुराचा तडाखा

व्हेनिस : उंच लाटांसोबत बुधवारी रात्री आलेल्या पाण्याच्या प्रचंड लोंढ्यांनी इटलीतील ऐतिहासिक व्हेनिस शहरात हाहाकार उडाला आहे. अनेक भाग जलमय झाले असून, ऐतिहासिक स्थळांत पाणी शिरले.
पाण्याची पातळी वाढतच असल्याने पर्यटक व्हेनिस शहरातून बाहेर पडण्यासाठी धडपडत आहेत. व्हेनिस शहरांवर जवळपास ५० वर्षांनंतर भीषण आपत्ती ओढवली असून, ही आपत्ती म्हणजे भविष्यातील जगबुडीचे सूचक असल्याचे बोलले जाते. इटली सरकार व्हेनिस शहरात आणीबाणी घोषित करण्याच्या तयारीत आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The city of Venice is in full swing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.