चीनच्या भरकटलेल्या रॉकेटचे अवशेष हिंदी महासागरात कोसळले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 06:06 AM2021-05-10T06:06:06+5:302021-05-10T06:10:19+5:30

बीजिंग : गेल्या काही दिवसांपासून जगाला चिंता लागून राहिलेल्या चिनी रॉकेटचे अवशेष अखेरीस हिंदी महासागरात मालदीवजवळ कोसळले. या घटनेत ...

The Chinese rocket crashed into the Indian Ocean | चीनच्या भरकटलेल्या रॉकेटचे अवशेष हिंदी महासागरात कोसळले 

चीनच्या भरकटलेल्या रॉकेटचे अवशेष हिंदी महासागरात कोसळले 

Next

बीजिंग : गेल्या काही दिवसांपासून जगाला चिंता लागून राहिलेल्या चिनी रॉकेटचे अवशेष अखेरीस हिंदी महासागरात मालदीवजवळ कोसळले. या घटनेत कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नसल्याचे चिनी तसेच अमेरिकी अवकाश संस्थांनी स्पष्ट केले आहे. अंतराळात भरकटलेल्या चिनी रॉकेटला जलसमाधी मिळाल्याने सगळ्यांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. 

नेमके प्रकरण काय - 
- ‘लाँग मार्च ५बी’ नावाचे रॉकेट २९ एप्रिल रोजी चीनच्या हैनान प्रांतातून अवकाशात झेपावले.
- त्यात ‘तिआन्ह’ हे मॉड्युल स्थापित करण्यात आले होते. चीनच्या अवकाश स्थानकासाठी ते महत्त्वाचे होते. 
- मिशन पूर्ण झाल्यावर ‘लाँग मार्च ५बी’ अनियंत्रित झाले.
- चिनी अवकाश संस्थेचा ‘लाँग मार्च ५बी’शी संपर्क तुटला.
- हे दिशाहीन रॉकेट अंतराळात भरकटले. त्यानंतर त्याचे अवशेष पृथ्वीच्या दिशेने खेचले जाऊ लागले.
- रॉकेट उंची १८६ फूट आणि वजन २३ टन एवढे होते.

सगळ्यांनीच सोडला सुटकेचा नि:श्वास 
- अवकाशात भरकटलेले ‘लाँग मार्च ५बी’नेमके कुठे पडणार यावर अमेरिकेसह युरोपीय देशांच्या अवकाश संशोधन संस्थांचा काथ्याकूट सुरू होता.
- रॉकेटचे अवशेष प्रशांत महासागर परिसरात कोसळतील असा प्राथमिक अंदाज होता.  परंतु रविवारी पहाटेच्या सुमारास हिंदी महासागरात मालदीवच्या उत्तरेकडे हे अवशेष कोसळल्याचे चीनने जाहीर केले.
- रॉकेटचे बहुतांश भाग पृथ्वीच्या वातावरणात शिरताच घर्षणाने जळून गेले व उर्वरित अवशेष हिंदी महासागर परिसरात कोसळले, असे चिनी माध्यमांनी म्हटले आहे.
- अमेरिकी संरक्षण मंत्रालयाच्या स्पेस कमांडनेही हिंदी महासागरात कोसळण्यापूर्वी रॉकेटचे हे अवशेष सौदी अरेबियाच्या अवकाशात होते, असे म्हटले आहे.

अंतराळातील कचरा म्हणजे काय  
विविध देशांकडून शोधमोहिमेसाठी वा तांत्रिक कारणांसाठी अंतराळात उपग्रह सोडले जात असतात. कालांतराने त्यांची उपयुक्तता संपुष्टात येऊन ते निकामी होतात. असे असंख्य उपग्रह वा रॉकेट्स पृथ्वीच्या कक्षेत अंतराळात दिशाहीनपणे फिरत असतात. या सगळ्याला अंतराळातील कचरा असे संबोधले जाते.

कचरा किती प्रमाणात -
- अंतराळात पृथ्वीच्या कक्षेत सुमारे २० हजार उपग्रह वा तत्सम उपकरणे, जी निकामी झाली आहेत, फिरत आहेत. त्यातील १२८ दशलक्ष तुकडे १ सेमी आकारापेक्षाही लहान आहेत.
- ९ लाख तुकडे १ ते १० सेमी आकाराचे.
- ३४ हजार तुकडे १० सेमीहून मोठ्या आकाराचे आहेत. यातील काही तुकडे चुंबकीय शक्तीमुळे एकत्र जोडले जातात.
- अशा एकत्रित तुकड्यांना मायक्रोमिटिऑरॉइड्स असे संबोधले जाते.
- हे तुकडे एखाद्या यानाच्या मार्गात आल्यास त्यामुळे उपग्रह वा यानाचे नुकसान होऊ शकते.
 

Web Title: The Chinese rocket crashed into the Indian Ocean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :chinaचीन