India China News: 'युद्ध झालं तर भारताचा पराभव निश्चित', चीनच्या सरकारी वृत्तपत्रातून भारताला थेट धमकीवजा इशारा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 07:40 PM2021-10-11T19:40:42+5:302021-10-11T19:41:38+5:30

भारत-चीन सीमेवर (India-China Border) सध्या तणावाचं वातावरण आहे. दोन्ही देशांमधील चर्चेच्या १३ व्या फेरीनंतरही सीमेवरील स्थितीत काही सुधारणा होताना पाहायला मिळत नाही.

Chinese Publication Global Times Warns India For War Amid Tense Situation On India China Border Lac | India China News: 'युद्ध झालं तर भारताचा पराभव निश्चित', चीनच्या सरकारी वृत्तपत्रातून भारताला थेट धमकीवजा इशारा!

India China News: 'युद्ध झालं तर भारताचा पराभव निश्चित', चीनच्या सरकारी वृत्तपत्रातून भारताला थेट धमकीवजा इशारा!

googlenewsNext

भारत-चीन सीमेवर (India-China Border) सध्या तणावाचं वातावरण आहे. दोन्ही देशांमधील चर्चेच्या १३ व्या फेरीनंतरही सीमेवरील स्थितीत काही सुधारणा होताना पाहायला मिळत नाही. चीनचं सरकारी वृत्तपत्र 'ग्लोबल टाइम्स'मधून (Global Times) तर आता थेट भारताला धमकीवजा इशारा देण्यात आला आहे. युद्ध झालंच तर भारताचा पराभव निश्चित आहे, असं 'ग्लोबल टाइम्स'मध्ये दावा करण्यात आला आहे. भारतीय सुरक्षा दल आणि चीनच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये आज झालेल्या बैठकीत भारतानं सुचवलेल्या मुद्द्यांवर चीनकडून सहमती मिळू शकली नाही. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव अजूनही कायम आहे. 

''भारतानं एक गोष्ट स्पष्टपणे समजून घ्यावी की ज्यापद्धतीनं त्यांना सीमेवर अतिक्रमण करायचं आहे ते प्रत्यक्षात होणं शक्य नाही. जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर निश्चित स्वरुपात भारतानं पराभवासाठी तयार राहावं", असं 'ग्लोबल टाइम्स'च्या संपादकीय लेखात नमूद करण्यात आलं आहे. भारत आणि चीनमधील सीमावाद अजूनही कायम असून यामागे भारतीय बाजूनं संवादात चुकीची भूमिका हे कारण आहे. भारताच्या मागण्या वास्तविक पातळीवर अव्यवहारिक आहेत, असंही चीननं म्हटलं आहे. 

दोन्ही देशांमध्ये तब्बल ८ तास चर्चा
दोन्ही देशांमध्ये चर्चेची १३ वी फेरी पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील (LAC) चूशुल-मोल्दो सीमा क्षेत्र परिसरात पार पडली.  कॉर्प्स कमांडर लेफ्टिनंट जनरल पीजीके मेनन आणि दक्षिण शिनजियांग मिलिट्री डिस्ट्रिक्ट चीफ मेजर जनरल लियु लिन यांच्या नेतृत्त्वात दोन्ही देशांमध्ये जवळपास साठेआठ तास चर्चा झाली. 

चीनी सैनिकांकडून रास्तारोको
देपसॉन्ग बुल्ज परिसरात काही ठिकाणांवर भारत आणि चीनी सैनिक एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. भारतीय सैनिकांना गेल्या वर्षापासूनच पारंपारिक पेट्रोलिंग पॉइंट असलेल्या पीपी-१०,११,११ए आणि १३ सोबतच देमचॉक सेक्टरमधील ट्रॅक जंक्शन चार्डिंग निंगलुंग नाला (CNN) पर्यंत पोहोचू दिलं जात नाहीय. चीनी सैनिकांनी या मार्गांमध्ये रास्ता रोको केलं आहे. 

Web Title: Chinese Publication Global Times Warns India For War Amid Tense Situation On India China Border Lac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.