चीनमध्ये ट्रक अन् बसचा भीषण अपघात, 36 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू, 36 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 09:00 AM2019-09-29T09:00:22+5:302019-09-29T09:00:44+5:30

चीनमध्ये रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात जवळपास 36 जणांना आपल्या प्राणांना मुकावे लागले आहे.

In China, truck and bus crashes, 36 passengers die, 36 injured | चीनमध्ये ट्रक अन् बसचा भीषण अपघात, 36 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू, 36 जखमी

चीनमध्ये ट्रक अन् बसचा भीषण अपघात, 36 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू, 36 जखमी

Next

बीजिंग- पूर्वी चीनमध्ये रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात जवळपास 36 जणांना आपल्या प्राणांना मुकावे लागले आहे. स्थानिक सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआच्या माहितीनुसार, भरधाव येणाऱ्या बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातातच 36 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 36 जण जवळपास जखमी आहेत. अपघात झाला तेव्हा बसमधून 69 प्रवासी प्रवास करत होते.

ही दुर्घटना चीनच्या पूर्वेकडच्या जिआंगसू प्रांतात शनिवारी सकाळी झाली आहे. भरधाव गाडीचा टायर पंक्चर झाल्यानं हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. चीनमध्ये वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यामुळे अशा प्रकारचे भीषण अपघात नेहमीच घडत असतात. चीनमध्ये 2015पासून आतापर्यंत 58 हजार लोकांचा अपघातात मृत्यू झाला. ज्यातील 90 टक्के वाहन चालकांनी नियमांचे पालन केलेले नव्हते. त्यामुळेच अशा दुर्घटना घडत असल्याचंही चीनमधल्या स्थानिक सरकारी वृत्तसंस्थेनं सांगितलं आहे. 

Web Title: In China, truck and bus crashes, 36 passengers die, 36 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :chinaचीन