गंभीर! तिबेटियन नागरिकांना जबरदस्तीने सैनिक बनवतोय चीन, भारताविरूद्ध तैनात करण्याचा डाव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 05:37 PM2021-07-30T17:37:23+5:302021-07-30T17:40:38+5:30

अत्यंत गंभीर गोष्ट म्हणजे, या तिबेटियन तरुणांना पीएलएमध्ये सामील होण्यासाठी लॉयल्टी टेस्टमधूनही जावे लागणार आहे.

China made mandatory for every tibetan family to send one member to pla deployed on lac | गंभीर! तिबेटियन नागरिकांना जबरदस्तीने सैनिक बनवतोय चीन, भारताविरूद्ध तैनात करण्याचा डाव

गंभीर! तिबेटियन नागरिकांना जबरदस्तीने सैनिक बनवतोय चीन, भारताविरूद्ध तैनात करण्याचा डाव

Next

आता चीनने तिबेटीयन नागरिकांना जबरदस्तीने सैनिक बनवायला सुरुवात केली आहे. चीनने प्रत्येक तिबेटियन कुटुंबातील एका सदस्याला सैनिक बनवणे अनिवार्य केले आहे. या सैनिकांची भरती पीपल्स लिब्रेशन आर्मीमध्ये करण्यात येणार आहे. बोलले जाते, की या तिबेटियन सैनिकांचा वापर चीन लाइन ऑफ अॅक्चुअल कंट्रोलवर अर्थात एलएसीवर भारताविरुद्ध करायच्या तयारीत आहे. 

अत्यंत गंभीर गोष्ट म्हणजे, या तिबेटियन तरुणांना पीएलएमध्ये सामील होण्यासाठी लॉयल्टी टेस्टमधूनही जावे लागणार आहे. 'India Today'ने आपल्या एका वृत्तात म्हटले आहे, की एलएसीवर आपली स्थिती कुठल्याही स्थितीत मजबूत करण्यासाठी चीन धडपडत आहे. यामुळेच, चीनने प्रत्येक तिबेटीय कुटुंबातून एक सदस्य पीएलएमध्ये भरती होने अनिवार्य केले आहे. नव्हे तसे फर्मानच सोडले आहे. असेही बोलले जाते, की चीन या तिबेटी सैनिकांना एलएसीजवळ म्हणजेच लडाख आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ तैनात करणार आहे.

CPEC आमच्या भूमीवर, काम त्वरित बंद करा; चीन-पाकिस्तानला भारताचा कडक इशारा

ज्या तिबेटी सैनिकांची नियुक्ती चीन आपल्यासैन्यात करत आहे, ते सर्व चीनमध्येच राहतात. सूत्रांच्या हवाल्याने मांध्यमांमध्ये प्रसिद्द झालेल्या वृत्तांनुसार, अशा स्वरुपाची गुप्त माहिती मिळाली आहे, की चिनी आर्मी तिबेटियन तरुणांची भरती करत आहे आणि एलएसीवर स्पेशल ऑपरेशन्सची तयारीही सुरू आहे. त्यामुले या नव्या सैनिकांचा रेग्यूलर अभ्यास सुरू आहे.

याअंतर्गत तिबेटीयन सैनिकांना चिनी भाषा शिकण्यासाठी सांगण्यात येत आहे. चीनची कम्युनिस्ट पार्टी आणि पार्टीचे नियम सर्वाच्च असल्याचे मानण्यास सांगण्यात येत आहे. मग ते दलाई लामा का असेना.
 

 

Web Title: China made mandatory for every tibetan family to send one member to pla deployed on lac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.