चीनच्या कुरापती सुरूच; देशाच्या 'सुधारित' नकाशात अरुणाचल प्रदेशचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 04:07 PM2020-04-21T16:07:56+5:302020-04-21T16:11:12+5:30

स्काय मॅपनं भारताच्या अरुणाचल प्रदेशसह देशाच्या इतर सीमांमधील भागांचा चीनच्या नकाशात समावेश केल्याचं समोर आलं आहे.

China includes Arunachal Pradesh in its updated map vrd | चीनच्या कुरापती सुरूच; देशाच्या 'सुधारित' नकाशात अरुणाचल प्रदेशचाही समावेश

चीनच्या कुरापती सुरूच; देशाच्या 'सुधारित' नकाशात अरुणाचल प्रदेशचाही समावेश

Next

बीजिंगः चीननेअरुणाचल प्रदेशच्या काही भागांना आपल्या आंतरराष्ट्रीय सीमेत समाविष्ट केल्याची धक्कादायक बाब स्काय मॅपने जारी केलेल्या अद्ययावत छायाचित्रांतून उघड झाली आहे. चीनचे डिजिटल नकाशे बनवण्याचा अधिकार स्काय मॅपला दिलेला असून, स्काय मॅप बीजिंगच्या राष्ट्रीय सर्वेक्षण आणि मॅपिंग भौगोलिक माहिती ब्युरो अंतर्गत काम करते. स्काय मॅपनं भारताच्याअरुणाचल प्रदेशसह देशाच्या इतर सीमांमधील भागांचा चीनच्या नकाशात समावेश केल्याचं समोर आलं आहे. तिबेटला लागून असलेला ईशान्येकडील अरुणाचल प्रदेश हा 1913-14मध्ये ब्रिटिश इंडियाचा भाग होता. 1938मध्ये मॅकमोहन लाइनद्वारे भारत आणि तिबेटच्या दरम्यानची सीमारेषा अधोरेखित करण्यात आली. चीन अरुणाचल प्रदेश हा तिबेटचाच एक भाग असल्याचं मानत आहे, ज्यावर चीननं 1951मध्ये ताबा मिळवलेला होता.

आतापर्यंत चीनचा नकाशा हा त्यांच्या राष्ट्रीय सीमेच्या आकाश नकाशाच्या 1989च्या आवृत्तीवर आधारित होता. त्यानंतर चीनने रशिया आणि मध्य आशियाई देशांसोबतचे सीमाप्रश्न जवळपास सोडवलेले आहेत, परंतु त्यातील काहीही नकाशावर प्रतिबिंबित केलेले नव्हते. डीडब्ल्यूच्या वृत्तानुसार, स्काय मॅपने आता देशातील समाविष्ट जिल्ह्यांच्या पातळीवर भौगोलिक माहिती चिनी नकाशावर अद्ययावत केली आहे. चीननं काही देशांच्या काऊंटीच्या सीमारेषा लाल रंगाने अधोरेखित केलेल्या असून, राष्ट्रीय सीमेवरील 1989च्या नकाशानुसार विशेषत: भूतान आणि भारताच्या सीमेवरील तिबेट भागात(अरुणाचल प्रदेश) पसरलेल्या आहेत,” असे अहवालात म्हटले आहे.

पूर्व आणि पश्चिमेकडे भारत आणि भूतानच्या सीमेवर असलेल्या तिबेटवर चीनने सार्वभौमत्वाचा दावा केला आहे. तसेच तिथल्या प्रदेशांना चायू काउंटी, मेदोग काउंटी, लिन्झी सिटी, कुआना काउन्टी, शॅनन सिटी, लुओझा काउंटी, कंगमा काउंटी, झिगाझ सिटी आणि यादोंग काउन्टी, अशी नकाशात नावं दिलेली आहेत. अद्ययावत स्काय मॅपनुसार, "चायू काउन्टीची दक्षिणेकडील सीमा 1989मधील सीमारेषेसारखीच आहे, मोटूओ काउन्टीचा दक्षिणेकडील भाग उत्तर दिशेने संकुचित झाला आहे आणि कुओना काउन्टीची दक्षिणेकडील सीमाही 1989मध्ये सीमारेषेच्या अनुरुप आहे. शॅनन शहरातील कुओना काउन्टी केवळ भारताच्याच नव्हे तर भूतानच्या सीमेला लागून असल्याचं दाखवण्यात आलं आहे.
 
चीन-भूतानमधील वादातीत सीमाक्षेत्र मुलासिंग हे मॅकमोहन लाईनच्या दक्षिणेस कुआना काउंटी येथे आहे. मुलासिंग मूळचा तिबेटचा होता आणि त्याचे व्यवस्थापन तवांग मंदिराद्वारे होत होते. 1949मध्ये भारत आणि भूतानने हस्तांतरणासाठी मैत्री करार झाला. त्यावेळी मुलासिंग हा प्रदेश भूतानच्या ताब्यात देण्यात आला. स्काय मॅपमध्ये, मुलासिंग प्रदेशातील कुओना काऊंटीची सीमा राष्ट्रीय सीमेच्या 1989च्या नकाशानुसार चीनच्या दक्षिणेस दाखवली आहे. "
तिबेट व्यतिरिक्त, झिनजियांगच्या काश्गर प्रदेशातील ताशकुरगान काउंटीच्या सीमा देखील बदलण्यात आल्या आहेत. सीमेचा वायव्य भाग 1989च्या नकाशाप्रमाणे जास्त आहे. चीन आणि ताजिकिस्तान दरम्यान 2011मधील सीमा करारानुसार हा अतिरिक्त भाग 1,158 आहे सरेकोले पर्वताच्या पूर्वेस चौरस किलोमीटर आहे. चीनने झिनजियांग प्रांताला लागून असलेल्या जम्मू-काश्मीर राज्याच्या पूर्वेकडील उंच-उंच भागातील सुमारे  37,000 चौरस किमी भारताच्या जमिनीवर कब्जा मिळवलेला असून, तिला अक्साई चीन असं म्हटलं जातं. 
 

Web Title: China includes Arunachal Pradesh in its updated map vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.