एस.जयशंकर यांच्या भाषणावर 'ड्रॅगन'चा थयथयाट! भारतच जमीन बळकावत असल्याच्या उलट्या बोंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 03:15 PM2021-06-25T15:15:25+5:302021-06-25T15:15:50+5:30

भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर (Foreign Minister S Jaishankar) यांनी कतार इकोनॉमिक फोरममध्ये (Qatar Economic Forum)दिलेल्या भाषणावरुन चीनचा थयथयाट झाला आहे.

China counters Indian foreign minister s jaishankar says India is occupying china territory | एस.जयशंकर यांच्या भाषणावर 'ड्रॅगन'चा थयथयाट! भारतच जमीन बळकावत असल्याच्या उलट्या बोंबा

एस.जयशंकर यांच्या भाषणावर 'ड्रॅगन'चा थयथयाट! भारतच जमीन बळकावत असल्याच्या उलट्या बोंबा

Next

भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर (Foreign Minister S Jaishankar) यांनी कतार इकोनॉमिक फोरममध्ये (Qatar Economic Forum)दिलेल्या भाषणावरुन चीनचा थयथयाट झाला आहे. जयशंकर यांनी खडेबोल सुनावल्यानंतर चीनला चांगलीच मिरची झोंबली असून भारत एक 'अतिक्रमणकारी' देश असल्याचा बेछुट आरोप चीननं केला आहे. चीननं केलेल्या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा भारत-चीन सीमेवर तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. भारत-चीन सीमेवरील तणावावरुन दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्यानंतरही कोणताही तोडगा निघालेला नाही. लडाखच्या पूर्व भागात तर आजही दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने तैनात आहेत. 

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता झाओ लिजियान यांनी सीमेजवळच्या पश्चिमी क्षेत्रात चीननं सैन्य तैनात केल्याची माहिती दिली. पण हे सैन्य एक सामान्य सुरक्षा व्यवस्था म्हणून तैनात करण्यात आलं आहे. जेणेकरुन शेजारील देशाकडून केल्या जाणाऱ्या अतिक्रमाणावर नियंत्रण ठेवता येईल, असंही ते म्हणाले. भारतीय सैन्य गेल्या अनेक काळापासून जास्तीत जास्त सैन्य तैनात करुन चीनच्या हद्दीत अतिक्रमण करत आहे, असा थेट आरोप झाओ यांनी केला आहे. दरम्यान, चीनचीकडूनच अतिक्रमण केलं जात असल्याचे आरोप याआधीपाहून अनेकदा भारत, नेपाळ, जापानकडून केले गेले आहेत. 

चीनचे भारतावर बेछूट आरोप
भारताचं अवैधरित्या चीनच्या हद्दीत अतिक्रमण हेच वादाचा मूळ कारण असल्याचं चीनच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे. सीमा वादावर आम्हाला शांतीपूर्ण पद्धतीनं तोडगा काढायचा आहे. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध सीमावादावरुन तोडणं योग्य ठरणार नाही. चर्चा हाच या वादावरचा पर्याय असल्याचंही झाओ यावेळी म्हणाले आहेत. 

दरम्यान, कतार इकोनॉमिक फोरमला संबोधित करताना भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी भारत-चीन द्विपक्षीय संबंधांसमोर अनेक आव्हानं निर्माण झाल्याचं म्हटलं होतं. सीमेवर चीनकडून मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करणं आणि सैन्य कमी करण्यासाठी सहकार्य न करणं असे आरोप जयशंकर यांनी केले होते. चीनकडून कोणत्याच पद्धतीची सकारात्मक चर्चा केली जात नाही. पूर्व लडाखमध्ये सीमा वादाचा विषय दोन्ही देश एकमेकांचा सन्मान आणि संवदेनशीलवृत्तीच्याच आधारावर सोडवू शकतात, असं जयशंकर यांनी म्हटलं होतं. 

चर्चेच्या ११ फेऱ्यांनंतरही तोडगा नाही
भारतीय लष्कराकडून पीएलएतील संबंधित वादग्रस्त सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी ६ जून २०२० पासून ते आतापर्यंत चीनसोबत चर्चेच्या ११ फेऱ्या झडल्या आहेत. पण त्यावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. दोन्ही सैन्यांमध्ये ६ जून २०२० रोजी पहिली चर्चा झाली होती. पण १५ जून गलवान खोऱ्यात अभूतपूर्व झटापट झाली आणि त्याचं गंभीर परिणाम झाले. दोन्ही देशांमधले संबंध आणखी ताणले गेले. यात २० भारतीय जवान शहीद झाले होते. 

Web Title: China counters Indian foreign minister s jaishankar says India is occupying china territory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.