वर्षभरापूर्वी व्हिसाची मुदत संपली असल्यास आता ड्रॉपबॉक्सच्या माध्यमातून अर्ज करू शकतो का?

By कुणाल गवाणकर | Published: December 19, 2020 11:56 AM2020-12-19T11:56:52+5:302020-12-19T12:01:41+5:30

सध्या व्हिसाची मुदत संपून २४ महिन्यांपर्यंतचा कालावधी झालेल्यांना ड्रॉपबॉक्सच्या माध्यमातून अर्ज करता येतोय.

Can I apply for a visa via courier if my visa expired more than a year ago | वर्षभरापूर्वी व्हिसाची मुदत संपली असल्यास आता ड्रॉपबॉक्सच्या माध्यमातून अर्ज करू शकतो का?

वर्षभरापूर्वी व्हिसाची मुदत संपली असल्यास आता ड्रॉपबॉक्सच्या माध्यमातून अर्ज करू शकतो का?

Next

प्रश्न: मला माझ्या कुटुंबाच्या भेटीसाठी अमेरिकेला जायचं आहे. माझ्याकडे असलेल्या बी१/बी२ व्हिसाची वैधता वर्षभरापूर्वी संपली आहे. मी काऊंटरच्या (ड्रॉपबॉक्स) माध्यमातून व्हिसासाठी अर्ज करू शकतो का? की मला मुलाखतीसाठी व्यक्तीश: यावं लागेल?

उत्तर: तुमचा व्हिसा कधीही रद्द झाला नसेल तर तुम्ही ड्रॉपबॉक्सच्या माध्यमातून अर्ज करू शकता. नॉनइमिग्रंट व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तींना डिपार्टमेंट ऑफ स्टेट आणि डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीने मुलाखतीतून सवलत दिली आहे. याआधी ज्यांच्या व्हिसाची मुदत संपून १२ महिन्यांपेक्षा कमी कालावधी झाला आहे, त्यांनाच मुलाखतीतून सूट दिली जायची. मात्र आता अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ स्टेटनं हा कालावधी २४ महिन्यांपर्यंत वाढवला आहे. हे धोरण ३१ डिसेंबर २०२० पर्यंत कायम आहे. मुलाखतीच्या सवलतीसाठीचे अधिक निकष जाणून घेण्यासाठी तुम्ही travel.state.gov ला भेट देऊ शकता.

भारतातील सर्व व्हिसा अर्ज केंद्रावर नॉनइमिग्रंट प्रकारात मोडणाऱ्या सर्व व्हिसांसाठी अर्ज (ड्रॉपबॉक्स) स्वीकारले जात आहेत. या अर्जांसाठी मुलाखतीची आवश्यकता नाही. तुम्ही ड्रॉपबॉक्सच्या माध्यमातून अर्ज करण्यासाठी पात्र आहात का, याबद्दलचे निकष तपासून पाहण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या. देशातील ड्रॉप-ऑफ ठिकाणांची माहिती मिळवण्यासाठी https://ustraveldocs.com ला भेट द्या.

भारतातील दूतावासांमध्ये उपलब्ध असणाऱ्या सेवा तात्पुरत्या काळासाठी स्थगित करण्यात आल्या आहेत. याशिवाय सध्या व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्यादेखील जास्त आहे. त्यामुळे व्हिसाशिवाय होणाऱ्या मुलाखतींसाठी कमी जणांना अपॉईंटमेंट्स दिल्या जात आहेत. ठराविक दिवसासाठी असलेल्या अपॉईंटमेंट्सची संख्या पूर्ण झाल्यावर तुम्हाला पुढील दिवसाची अपॉईंटमेंट दिली जाते. अपॉईंटमेंट मिळवण्यासाठी www.ustraveldocs.com हे संकेतस्थळ पाहात राहा.

मुंबईतील अमेरिकेच्या दूतावासात अपॉईंटमेंट मिळत नसल्यास तुम्ही देशातील इतर ठिकाणी अपॉईंटमेंटसाठी अर्ज करू शकता.
 

Web Title: Can I apply for a visa via courier if my visa expired more than a year ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.