Blast In Rawalpindi: A fierce explosion in Pak military hospital; The explosion in the explosion of Masood Azhar | Blast In Rawalpindi: पाक सैन्याच्या हॉस्पिटलमध्ये भीषण स्फोट; स्फोटात दहशतवादी मसूद अजहरचा मृत्यू? 
Blast In Rawalpindi: पाक सैन्याच्या हॉस्पिटलमध्ये भीषण स्फोट; स्फोटात दहशतवादी मसूद अजहरचा मृत्यू? 

कराची - पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील रावलपिंडी येथे सैन्याच्या हॉस्पिटलमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटावेळी हॉस्पिटलमध्ये जागतिक संघटनेने दहशतवादी घोषित केलेला जैश-ए-मोहम्मदचा मुख्य मसूद अजहरदेखील उपचारासाठी दाखल होता. अद्याप मसूद अजहरचं या स्फोटात नुकसान झालं की नाही याबाबत काही माहिती मिळाली नाही. 

स्फोटात जखमी आणि मृत झालेली आकडेवारी अधिकृतरित्या समोर आलेली नाही. मात्र पाकिस्तानी सूत्रांनुसार कमीत कमी 16 लोक या गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु आहेत. हा स्फोट नक्की कोणी घडवून आणला याबाबत कळू शकलं नाही. काही जणांचे म्हणणं आहे की, गॅस पाईपलाइन लिकेज झाल्याने हा स्फोट घडला असावा पण पाकिस्तान सेनेकडून याबाबत दुजोरा आला नाही. पाकिस्तान सेना मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर हे सैन्याचं हॉस्पिटल आहे. मात्र सेना आणि सरकारकडून मिडीयाला स्फोटाचं वृत्तांकन करण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे मसूज अजहरबद्दल अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. मात्र सोशल मिडीयावर स्फोटाशी जोडलेले अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. 


ऑक्टोबर 2017 मध्येही बलूचिस्तान या प्रांतात सूफी दर्गाहजवळ आत्मघाती स्फोट घडवून आणला होता. त्या स्फोटात 18 जणांचा मृत्यू झाला होता तर 24 जण जखमी झाले होते. 

कोण आहे मसूद अजहर?

  • मसूद अजहर हा जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आहे. 
  • भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी अजहरनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रशिक्षण केंद्रं उभारली होती. 
  • इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचं अपहरण झाल्यानंतर भारताला 1999 मध्ये अजहरची सुटका करावी लागली होती. 
  • यानंतर अजहरनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळ सुरू केले. काश्मीरमध्ये झालेल्या अनेक कारवायांमध्ये अजहरचा हात आहे.
  • पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला त्यात 40 जवान शहीद झाले या हल्ल्याची जबाबदारी मसूद अजहरच्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घेतली होती.
  • काही दिवसांपूर्वीच मसूद अजहरला संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. 

English summary :
Blast in Pakistan's Rawalpindi hospital : A powerful explosion occurred in the army hospital in Rawalpindi, Islamabad. Masood Azhar, chief of the Jaish-e-Mohammad, who was declared a terrorist by the World Organization may present in this hospital. Yet there was no information about whether Masood Azhar was died in the hospital.


Web Title: Blast In Rawalpindi: A fierce explosion in Pak military hospital; The explosion in the explosion of Masood Azhar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.