इराणमध्ये तेलाच्या पाइपलाइनचा भीषण स्फोट; सुदैवाने जीवितहानी नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 04:53 PM2021-11-17T16:53:56+5:302021-11-17T16:54:59+5:30

Blast Hits Oil Pipeline in Southern Iran : खुजेस्तान प्रांतातील रामिस या इराणी गावात बुधवारी सकाळी स्फोट झालाअद्याप या स्फोटात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त समोर आलेलं नाही. 

Blast Hits oil pipeline in Iran; Fortunately no casualties | इराणमध्ये तेलाच्या पाइपलाइनचा भीषण स्फोट; सुदैवाने जीवितहानी नाही

इराणमध्ये तेलाच्या पाइपलाइनचा भीषण स्फोट; सुदैवाने जीवितहानी नाही

googlenewsNext

बुधवारी इराणच्या तेल पाइपलाइनचा स्फोट झाला. ही घटना दक्षिण इराण भागात घडली आहे. खुजेस्तान प्रांतातील रामिस या इराणी गावात बुधवारी सकाळी स्फोट झालाअद्याप या स्फोटात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त समोर आलेलं नाही. 

स्फोटाची तीव्रता इतकी होती की, परिसरात भूकंपासारखा धक्का जाणवला. इराणमध्ये गेल्या १२ महिन्यांत आगी आणि स्फोटांच्या अनेक घटना घडल्या आहेत. "या अपघातामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही," तेल समृद्ध खुजेस्तानच्या प्रांतातील स्थानिक अधिकाऱ्याने माध्यमांना आग आता विझवण्यात आली असल्याची माहिती दिली. 

जूनमध्ये पूर्व इराणमधील झारंड इराणी स्टील कंपनीत स्फोट आणि आग लागल्याची नोंद झाली होती. एक आठवड्यापूर्वी, इराणचे सर्वात मोठे नौदल जहाज आगीत नष्ट झाल्यानंतर ते बुडाले. गेल्या आठवड्यात तेहरानच्या दक्षिणेकडील तेल शुद्धीकरण कारखान्यातही मोठी आग लागली होती, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अलिकडच्या काही महिन्यांत संपूर्ण इराणमधील अनेक पेट्रोकेमिकल प्लांटमध्ये अतिरिक्त आग लागल्याची नोंद झाली आहे.

Web Title: Blast Hits oil pipeline in Iran; Fortunately no casualties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.