Bioweapon : चिनी शास्त्रज्ञ कोरोनाला बनवत होते जैविक हत्यार? लीक कागदपत्रांमध्ये तिसऱ्या महायुद्धाच्या तयारीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 12:45 PM2021-05-09T12:45:44+5:302021-05-09T12:54:47+5:30

Bioweapon : चिनी शास्त्रज्ञ तिसरे महायुद्ध लढण्यासाठी कोरोना विषाणूच्या मदतीने बायो-शस्त्रे तयार करण्याचे काम करीत होते.

Bioweapon : Asian countries leaked document claims that chinese scientists were working on coronavirus as bioweapon | Bioweapon : चिनी शास्त्रज्ञ कोरोनाला बनवत होते जैविक हत्यार? लीक कागदपत्रांमध्ये तिसऱ्या महायुद्धाच्या तयारीचा दावा

Bioweapon : चिनी शास्त्रज्ञ कोरोनाला बनवत होते जैविक हत्यार? लीक कागदपत्रांमध्ये तिसऱ्या महायुद्धाच्या तयारीचा दावा

Next

कोरोना व्हायरसची माहामारी गेल्या दीड वर्षापासून अधिकाधिक  घातक रूप  धारण करत आहे. अजूनही कोरोनाच्या प्रसाराबाबत लोकांना पुरावे सापडलेले नाहीत. सगळ्यात आधी जबाबदार ठरलेल्या चीनने या आरोपांचे खंडन केले आहे. ज्यात वुहानच्या बाजारातून किंवा कोणत्याही लॅबमधून हा आजार पसरलेला नाही असे सांगण्यात आले होते.

सहा वर्ष जुन्या कागपत्रांमध्ये नमुद केलेल्या माहितीनुसार, चिनी शास्त्रज्ञ तिसरे महायुद्ध लढण्यासाठी कोरोना विषाणूच्या मदतीने बायो-शस्त्रे तयार करण्याचे काम करीत होते. अमेरिकन अधिकाऱ्यांना सापडलेल्या या कागदपत्रात असे म्हटले आहे की जैव आणि अनुवांशिक शस्त्रे 6 वर्षांपासून तयार केली गेली आहेत.

अमेरिकन विदेश मंत्रालयाला सापडलेल्या दस्ताऐवजामधून दावा करण्यात आला आहे की, युद्धात जिंकण्यासाठी जैव हे हत्यार मुख्य असणार आहे. याच्या वापराची योग्यवेळही सांगण्यात आली आहे.  याशिवाय शत्रूच्या वैद्यकिय व्यवस्थेवरचा परिणामही नमूद करण्यात आला आहे.

दि ऑस्ट्रेलियनच्या रिपोर्टमध्ये पीपल्स लिबरेशन आर्मीचे वैद्यानिक आणि आरोग्य अधिकारी,  हत्यार  तयार करण्यासाठी आजारांचा वापर करत असल्याची माहिती देण्यात आली होती. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास या १८ वैज्ञानिक हायरिस्क लॅबमध्ये काम  करत होते. 

या कागजपत्रांच्या लेखकांच्या म्हणण्यानुसार, तिसरे महायुद्ध ' जैविक युद्ध असेल. पहिल्या महायुद्धाला केमिकल आणि दुसरे युद्ध अणु म्हणतात. त्यात म्हटले आहे की दुसर्‍या महायुद्धात अणुबॉम्बने विजय मिळवून दिला आणि हल्ल्यानंतर जपानने आत्मसमर्पण केले, त्याचप्रमाणे तिसर्‍या महायुद्धात जैविक-शस्त्रे जिंकवतील. 

अमेरिकन तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या अहवालामुळे चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग कोणत्या उद्देशाने काम करीत आहेत? याविषयी प्रश्न आणि चिंता निर्माण झाली आहे. त्यांचे म्हणणे आहे की बरेच नियंत्रण असूनही अशी शस्त्रे प्राणघातक ठरू शकतात.

Web Title: Bioweapon : Asian countries leaked document claims that chinese scientists were working on coronavirus as bioweapon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.