बैरूतमधील स्फोटातील मृतांची संख्या १०० वर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 03:04 AM2020-08-06T03:04:56+5:302020-08-06T03:05:17+5:30

४,००० पेक्षा अधिक जखमी : लेबनॉनमध्ये दोन आठवड्यांची आणीबाणी

Beirut blast death toll rises to 100 | बैरूतमधील स्फोटातील मृतांची संख्या १०० वर

बैरूतमधील स्फोटातील मृतांची संख्या १०० वर

Next

बैरूत : लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये झालेल्या भीषण स्फोटात १०० जण ठार, तर ४,००० पेक्षा अधिक जण जखमी झाले. फटाके व अमोनियम नायट्रेटमुळे स्फोटाची तीव्रता आणखी वाढली. रेडक्रॉसच्या अधिकाऱ्यांनी स्फोटातील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. दरम्यान, लेबनॉनमध्ये दोन आठवड्यांची आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.

स्फोटामुळे बंदराचा मोठा भाग व अनेक इमारतींचे मोठे नुकसान झाले. जर्मनीतील जिओसायन्स केंद्रात या स्फोटामुळे ३.५ तीव्रतेचा भूकंप झाल्याची नोंद झाली आहे. स्फोटाची तीव्रता एवढी भीषण होती की, तब्बल २०० किलोमीटरपर्यंत त्याचा आवाज ऐकायला मिळाला. स्फोट झाल्याच्या दुसºया दिवशीही अनेक इमारतींमधून धुराचे लोट निघत होते. रस्त्यावर अनेक क्षतिग्रस्त वाहने पडलेली दिसत होती. आपल्या कुटुंबियांच्या तब्येतीची माहिती जाणून घेण्यासाठी अनेक जणांनी रुग्णालयांच्या बाहेर गर्दी केली होती. कोरोना व्हायरस व आर्थिक संकटाशी मुकाबला करीत असलेल्या या देशात या स्फोटाने नवीन संकट उभे केले आहे.

लेबनॉनचे गृहमंत्री मो. फहमी यांनी सांगितले की, बंदरातील गोदामांत तब्बल २,७०० टन अमोनियम नायट्रेटचा साठा केल्यामुळे हा स्फोट झाला. स्फोटाला जबाबदार असलेल्यांना याची किंमत चुकवावी लागेल, असे लेबनॉनचे पंतप्रधान हसन दीब यांनी म्हटले आहे. तथापि, इस्रायल सरकारच्या एका अधिकाºयाने ओळख जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, या स्फोटाशी इस्रायलचे काही देणे-घेणे नाही.


दरम्यान, हा स्फोट म्हणजे हल्ला असू शकतो, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

पॉपकॉर्न फुटल्यासारखा आवाज
च्हे स्फोट फटाक्यांमुळे झाल्याचे संकेत मिळत आहेत, असे इस्रायली कंपनी तमार समूहाचे मालक बोयज हेओऊन यांनी सांगितले. विशेष म्हणजे तमार समूह स्फोटकांची सुरक्षा व प्रमाणनामध्ये इस्रायल सरकारबरोबर काम करीत आहे. त्यांनी सांगितले की, स्फोटापूर्वी तुम्ही आगीच्या केंद्रस्थानी पाहा. तुम्ही तेथे ठिणगी पाहू शकता. पॉपकॉर्न बनवताना जसा आवाज येतो, तसा आवाज येथे ऐकू येतो.

च्कॅलिफोर्नियातील क्षेपणास्त्रतज्ज्ञ जेफरी लिविस यांचेही म्हणणे आहे की, हा फटाके फोडल्यासारखाच आवाज आहे. छोट्या आगीपासून मोठा धमाका झाला आहे. हा अपघात वाटतो.

च्स्फोटानंतर नारिंगी रंगाचे ढग म्हणजे संभवत: विषारी नायट्रोजन डायआॅक्साईड वायू आहे. तो स्फोटातील नायट्रेटमुळे निघतो.

च्स्फोटाच्या ठिकाणी केवढा मोठा खड्डा झाला आहे, त्यावरून तज्ज्ञ धमाक्याची तीव्रता मोजतात. बुधवारी सकाळी घटनास्थळी घेतलेल्या छायाचित्रात मोठ्ठा खड्डा दिसत आहे.

Web Title: Beirut blast death toll rises to 100

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.