पाकिस्तानला आणखी झटका! मलेशियात PIA चं विमान जप्त झाल्यानंतर अमेरिका, पॅरिसमधील हॉटेलही अ‍ॅटॅच

By जयदीप दाभोळकर | Published: January 19, 2021 09:03 AM2021-01-19T09:03:45+5:302021-01-19T09:07:40+5:30

यापूर्वी मलेशियानं जप्त केलं होचं PIA चं विमान

Another blow to Pakistan! Hotels in the US and Paris were also attached after the PIA plane was seized in Malaysia | पाकिस्तानला आणखी झटका! मलेशियात PIA चं विमान जप्त झाल्यानंतर अमेरिका, पॅरिसमधील हॉटेलही अ‍ॅटॅच

पाकिस्तानला आणखी झटका! मलेशियात PIA चं विमान जप्त झाल्यानंतर अमेरिका, पॅरिसमधील हॉटेलही अ‍ॅटॅच

Next
ठळक मुद्देयापूर्वी रक्कम न चुकवल्याप्रकरणी मलेशियानं जप्त केलं होती पीआयएचं विमानपीआयएच्या अमेरिकेतील, पॅरिसमधील हॉटेल विक्रीवरही बंधनं

पाकिस्तानला सध्या एकामागून एक झटके लागण्यास सुरूवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी पैसे न चुकवल्यामुळे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचं विमान मलेशियानं जप्त केलं होतं. तसंच त्यातील प्रवाशांनाही खाली उतरवण्यात आलं होतं. त्यानंतर आता पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या अमेरिका आणि पॅरिसमधील हॉटेल्सनादेखील अ‍ॅटॅच करण्यात आलं आहे. 

पाकिस्तानी माध्यमांमधील वृत्तानुसाप न्यूयॉर्कमधील रुझवेल्ट हॉटेल आणि पॅरिसमधील स्क्राईब हॉटेल अ‍ॅटॅच करण्यात आले आहेत. प्रलंबित असलेल्या आंतरराष्ट्रीय प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला आता या हॉटेल्सची विक्री करता येणार नाही. ब्रिटनच्या उच्च न्यायालयानं पाकिस्तानच्या उच्चायोगाच्या खात्यातून २८.७ दशलक्ष डॉलर्सची रक्कम देण्याचे आदेशही दिले आहेत. 

पाकिस्तानकडून कर्ज न चुकवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, पाकिस्ताननंही सरकारच्या दुतावासांच्या खात्यात केळ किमान रक्कम ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी मलेशियात पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचं बोईंग-७७७ हे विमान जप्त करण्यात आलं होतं. विमान उड्डाणाच्या तयारीत असतानाच ही कारवाई करण्यात आली होती. या विमानात तब्बल १७२ प्रवासी होते. यानंतर पाकिस्ताननं भाडेतत्त्वावर घेतलेलं अन्य विमानही जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पाकिस्तानचं विमान जप्त करण्याची कारवाई झाल्यानंतर पाकिस्तान परदेशातील आपली संपत्ती विकण्याचे प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पाकिस्तान मलेशियातील न्यायालयात पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचं विमान तात्काळ सोडवण्यासाठी सुनावणी घेण्यास योग्य ती पावलं उचलत असल्याचं पीआयएकडून सांगण्यात आलं. तर दुसरीक़डे पाकिस्ताच्या नागरी उड्डाण मंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं असून पीआयएनं २०१५ मध्ये दोन विमानं भाडेतत्त्वार घेतली असून कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर पैसे चुकवता आले नसल्याचं सांगितलं आहे.

Web Title: Another blow to Pakistan! Hotels in the US and Paris were also attached after the PIA plane was seized in Malaysia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.