गरम Soup वरून जोरदार वादावादी, महिलेनं मॅनेजरला दिली अशी शिक्षा, घटना सीसीटीव्हीत कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 08:09 AM2021-11-11T08:09:12+5:302021-11-11T08:10:30+5:30

Woman Throws Steaming Hot Soup In Restaurant Manager’s Face : अमेरिकेतील टेक्सासमधील 'सोल डी जॅलिस्को' या मेक्सिकन रेस्टॉरंटमध्ये 7 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली.

Angry Woman Throws Steaming Hot Soup In Restaurant Manager’s Face In Shocking Video | गरम Soup वरून जोरदार वादावादी, महिलेनं मॅनेजरला दिली अशी शिक्षा, घटना सीसीटीव्हीत कैद

गरम Soup वरून जोरदार वादावादी, महिलेनं मॅनेजरला दिली अशी शिक्षा, घटना सीसीटीव्हीत कैद

Next

वॉशिंग्टन : अमेरिकेतील America एका महिलेला रेस्टॉरंटच्या सर्व्हिसबाबत इतका राग आला की, तिने थेट मॅनेजरच्या तोंडावर गरम सूप Soup फेकले. सुदैवाने या घटनेत मॅनेजरला फारशी दुखापत झाली नाही. ही संपूर्ण घटना रेस्टॉरंटमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये CCTV कैद झाली असून सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आरोपी महिलेसोबत एक व्यक्तीही उपस्थित होता. या घटनेनंतर दोघेही फरार झाले आहेत.

पहिल्यांदा फोनवर वादावादी
'मेट्रो यूके'च्या वृत्तानुसार, अमेरिकेतील टेक्सासमधील 'सोल डी जॅलिस्को' या मेक्सिकन रेस्टॉरंटमध्ये 7 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. दरम्यान, महिलेने सूप मागवले होते. डिलिव्हरीनंतर काही वेळातच महिलेने रेस्टॉरंटमध्ये फोन करून मॅनेजरकडे तक्रार करण्यास सुरुवात केली. महिलेने सांगितले की, सूप खूप गरम होते, त्यामुळे प्लास्टिकचे झाकण वितळले होते. फोनवरून वाद झाल्यानंतर महिला थेट रेस्टॉरंटमध्ये पोहोचली.

घटनेनंतर महिला फरार
रेस्टॉरंटमध्ये पोहोचल्यावर आरोपी महिलेने मॅनेजर जेनेल ब्रोलँड यांना सूपचा बॉक्स दाखवत पुन्हा वाद घातला. यावेळी काही वेळ दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर अचानक महिलेने सूपचा डबा उचलून मॅनेजरच्या तोंडावर फेकला. त्यानंतर आरोपी महिला आणि तिच्यासोबत असलेला व्यक्ती पळून गेले. मॅनेजरनेही त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र ते पळून जाण्यात यशस्वी झाले. यानंतर पीडित मॅनेजरने पोलिसांना घटनेची माहिती दिली.

मॅनेजर पैसे परत करण्यास मान्य झाली होती
आतापर्यंत सूप फेकणाऱ्या महिलेबाबत पोलिसांना काहीही सापडलेले नाही. या घटनेनंतर रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे. मॅनेजरच्या म्हणण्यानुसार, महिलेने आरोप केला आहे की, जेव्हा तिने सूप प्यायला उचलले तेव्हा ते इतके गरम होते की त्यावरील प्लास्टिकचे झाकण वितळत होते. यावर तिने माफी मागितली आणि पैसे परत करण्याची ऑफरही दिली, मात्र ती रागावली आणि शिवीगाळ करू लागली आणि नंतर ती सूप फेकून पळून गेली.

आरोपी महिलेचा शोध सुरू
दरम्यान, या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सूप थंड झाले होते त्यामुळे मॅनेजरला दुखापत झाली नाही. मॅनेजर जेनेल ब्रोलँड म्हणाली, सूप थोडे गरम असल्याचे जाणवले. डोळ्यात खूप जळजळ होती, असे वाटत होते की आता सगळं संपले. पण देवाचे आभार जास्त काही दुखापत झाली नाही. सध्या पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून फुटेजच्या आधारे तिचा शोध सुरू आहे.

Read in English

Web Title: Angry Woman Throws Steaming Hot Soup In Restaurant Manager’s Face In Shocking Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.