अनंत अंबानी यांचा आंतरराष्ट्रीय सन्मान! मिळाला प्रतिष्ठेचा 'ग्लोबल ह्यूमॅनिटेरियन' पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 20:34 IST2025-12-09T20:33:53+5:302025-12-09T20:34:59+5:30
Anant Ambani wins Global Humane Society Award: अनंत अंबानी हा पुरस्कार मिळवणारे सर्वात तरुण आणि पहिले आशियाई व्यक्ती बनले ठरले

अनंत अंबानी यांचा आंतरराष्ट्रीय सन्मान! मिळाला प्रतिष्ठेचा 'ग्लोबल ह्यूमॅनिटेरियन' पुरस्कार
Anant Ambani wins Global Humane Society Award: ग्लोबल ह्यूमन सोसायटीने वन्यजीव संवर्धन केंद्राचे 'वनतारा'चे संस्थापक अनंत अंबानी यांना वन्यजीव संवर्धनातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठित ग्लोबल ह्यूमॅनिटेरियन अवॉर्ड फॉर अॅनिमल वेलफेअरने सन्मानित केले. या सन्मानासह अनंत अंबानी हे जागतिक मान्यता मिळवणारे सर्वात तरुण आणि पहिले आशियाई व्यक्ती बनले आहेत. जगभरातील वन्यजीव संवर्धन तज्ज्ञ आणि वन्यजीव कल्याणाचा विचार करणारे स्वयंसेवक उपस्थित असलेल्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमादरम्यान हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अनंत अंबानी यांना हा जागतिक सन्मान का मिळाला?
ग्लोबल ह्यूमन सोसायटीने स्पष्ट केले की हा पुरस्कार अशा व्यक्तींना दिला जातो, ज्यांच्या आयुष्यभराच्या वचनबद्धतेचा जागतिक स्तरावर प्राणी आणि निसर्गावर सकारात्मक प्रभाव पडतो. वनतारा हा अनंत अंबानी यांचा उपक्रम जगातील सर्वात व्यापक आणि प्रभावी संवर्धन प्रकल्पांपैकी एक मानला जातो. अनंत अंबानी यांना त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी आणि पुराव्यावर आधारित संवर्धन कार्यासाठी सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात प्राणी बचाव आणि पुनर्वसन, लुप्तप्राय प्रजातींचे संवर्धन, विज्ञान-आधारित संवर्धन कार्यक्रम आणि जागतिक जैवविविधतेचे संरक्षण करण्याचे प्रयत्न यांचा समावेश आहे.
अनंत अंबानी काय म्हणाले?
पुरस्कार स्वीकारल्यानंतर अनंत अंबानी म्हणाले, "मी ग्लोबल ह्यूमन सोसायटीचा आभारी आहे. हा सन्मान मला वन्यजीवांच्या हिताबाबत भारतीय परंपरेची आठवण करून देतो. त्याचा अर्थ सर्व सजीवांचे कल्याण असा आहे. प्राणी आपल्याला संतुलन, नम्रता आणि विश्वास शिकवतात. सर्व जीवांना आदर, काळजी आणि आशा देणे हे वनताराचे ध्येय आहे. संवर्धन हा भविष्याचा नाही तर आजच्या वर्तमानकाळाचा धर्म आहे. आपण हे कायम लक्षात ठेवायला हवे."