चीनसोबत युद्धासाठी अमेरिका तयार करतोय 'किलर मिसाइल्स'चा साठा, 'अशी' आहे सैन्याची रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 09:25 PM2020-05-12T21:25:41+5:302020-05-12T21:42:17+5:30

अमेरिका केवळ युद्धाची रणनीतीच तयार करत नाही, तर मोठ्या प्रमाणावर शस्त्र साठाही तयार करत आहे. याचाच एक भाग म्हणून अमेरिका खाडी युद्ध ते अफगाणिस्तानविरोधातील मोहिमेत यशस्वी ठरलेल्या क्रूझ मिसाइलची क्षमताही वाढवत आहे.

Amid South China sea tension America is making killer missiles for war with China sna | चीनसोबत युद्धासाठी अमेरिका तयार करतोय 'किलर मिसाइल्स'चा साठा, 'अशी' आहे सैन्याची रणनीती

चीनसोबत युद्धासाठी अमेरिका तयार करतोय 'किलर मिसाइल्स'चा साठा, 'अशी' आहे सैन्याची रणनीती

Next
ठळक मुद्देक्रूझ मिसाइलची क्षमताही वाढवत आहे अमेरिकाप्रशांत महासागर हे अमेरिका आणि चीन यांच्या तणावाचे केंद्र बनले आहेटॉमहॉक क्रूझ मिसाइल सर्वप्रथम 1991च्या  खाडी युद्धाच्यावेळी प्रसिद्ध झाले होते

वॉशिंग्टन : कोरोना व्हायरस, साउथ चायना सी, जपान आणि तौवानच्या मुद्द्यावरून चीन आणि अमेरिकेदरम्यान तणावाचे वातावरण आहे. यातच आता अमेरिकेने पीएलएसह युद्धाची तयारी सुरू केली आहे. अमेरिका केवळ युद्धाची रणनीतीच तयार करत नाही, तर मोठ्या प्रमाणावर शस्त्र साठाही तयार करत आहे. याचाच एक भाग म्हणून अमेरिका खाडी युद्ध ते अफगाणिस्तानविरोधातील मोहिमेत यशस्वी ठरलेल्या क्रूझ मिसाइलची क्षमताही वाढवत आहे.

दक्षिण चीन समुद्र आहे तणावाचे केंद्र -
रॉयटर्स या वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत महासागर हे अमेरिका आणि चीन यांच्या तणावाचे केंद्र बनले आहे. चीन वेगाने आपला शस्त्रसाठा वाढवत आहे. तर जगतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेनेही बिजिंगबरोबर कुठल्याही युद्धासाठी कंबर कसली आहे. अमेरिका आपल्या यशस्वी मिसाईल्सपैकी एक असलेल्या टॉमहॉक क्रूझ मिसाइलची नवी अवृत्ती तयार करत आहे.

आणखी वाचा - योगी सरकारचा तब्बल 16 लाख कर्मचाऱ्यांना झटका, सहा प्रकारचे भत्ते कायमचे बंद

टॉमहॉक क्रूझ मिसाइलने सज्ज होतील मरीन -
अ‍मेरिका आपल्या मरीन सैन्यालाही टॉमहॉक मिसाइलने सज्ज करणार आहे. आता आशियन प्रशांत भागात लांब पल्ल्याचे आणि जमिनीवरून मारा करता येतील, असे मिसाइल्स तैनात करण्याची योजना अमेरिकेने आखली आहे. अमेरिकेने अनेक दशकांनंतर लांब पल्ल्याचे अँटी शीप मिसाइल तयार करायला सुरुवात केली आहे. यावर, अमेरिकेने धमक्या देणे बंद करावे, असे चीनने म्हटले आहे.

आणखी वाचा - CoronaVirus News : संशोधकांचा दावा; आणखी 2 वर्षे हाहाकार माजवणार कोरोना, 'या'मुळे होऊ शकणार नही खात्मा

अशी आहे चीनविरोधात अमेरिकेची रणनीती -
अमेरिकन सैन्‍याच्या कमांडर्सनी गेल्या काही दिवसांपूर्वी कांग्रेसला सांगितले, की टॉमहॉक क्रूझ मिसाइल्सने सज्ज असलेले मरीन सैनिक पश्चिमी प्रशांत महासागरावर नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिकन नौदलाची मदत करतील. मरीन कोरचे कमांडंट जनरल डेव्हिड बर्गर म्हणाले, 'टॉमहॉक क्रूझ मिसाइल आम्हाला, या कामासाठी अत्यंत उपयोगी ठरेल.' टॉमहॉक क्रूझ मिसाइल सर्वप्रथम 1991च्या  खाडी युद्धाच्यावेळी प्रसिद्ध झाले होते. यूएस मरीनसाठी नवे मिसाइल 2022पर्यंत तयार होतील. 

अमेरिका एका लांब पल्ल्याच्या मिसाइल्सचे परीक्षण करत आहे, जे चिनी युद्धनौकांना निशाणा बनवू शकते. यामुळेच चीन अस्वस्थ झाला आहे.

आणखी वाचा - CoronaVirus News: धक्कादायक!; 6 दिवसांपूर्वी थाटात केलं लग्न, आता नवरदेवच निघाला कोरोना पॉझिटिव्ह, संपूर्ण गावात कर्फ्यू

Web Title: Amid South China sea tension America is making killer missiles for war with China sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.