Kamala Harris: कमला हॅरिस, जो बायडेन यांच्यातील संबंध बिघडले? एकत्र दिसत नसल्याने अमेरिकेत चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 04:55 PM2021-10-28T16:55:25+5:302021-10-28T16:56:04+5:30

Joe Biden-Kamala Harris rift: अमेरिकेतील राजकीय वर्तुळात ही चर्चा जोरावर आहे. घसरणाऱ्या पोल नंबर्समुळे कलमा हॅरिस यांनी बायडेन यांच्यापासून अंतर राखल्याचे किंवा दोघांमध्ये संबंध बिघडल्याचे म्हटले जात आहे.

America's right wing rife with talk of Joe Biden-Kamala Harris rift | Kamala Harris: कमला हॅरिस, जो बायडेन यांच्यातील संबंध बिघडले? एकत्र दिसत नसल्याने अमेरिकेत चर्चा

Kamala Harris: कमला हॅरिस, जो बायडेन यांच्यातील संबंध बिघडले? एकत्र दिसत नसल्याने अमेरिकेत चर्चा

googlenewsNext

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) आणि उप राष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस (Kamala Harris) यांच्यातील संबंध बिघडल्याच्या चर्चांना अमेरिकेत उधाण आले आहे. ट्रम्प सरकार पडल्यानंतर दोघेही एकत्र कार्यक्रमांत दिसत होते. मात्र, आता क्वचितच सार्वजनिक कार्यक्रमांना एकत्र उपस्थित राहत असल्याने दोघांमध्ये अंतर वाढल्याचे बोलले जात आहे. 

अमेरिकेतील राजकीय वर्तुळात ही चर्चा जोरावर आहे. घसरणाऱ्या पोल नंबर्समुळे कलमा हॅरिस यांनी बायडेन यांच्यापासून अंतर राखल्याचे किंवा दोघांमध्ये संबंध बिघडल्याचे म्हटले जात आहे. हा अंदाज पहिल्यांदा विरोधी मीडियामधून प्रसारित करण्यात आला होता. मात्र, याची चर्चा एवढ्या मोठ्या प्रमाणावर होऊ लागली की अन्य मीडिया हाऊसनादेखील याची दखल घ्यावी लागली आहे. 

कमला हॅरिस आणि जो बायडेन हे आता फार क्वचित सार्वजनिक कार्यक्रमांना एकत्रित हजेरी लावतात. सरकार स्थापन झाल्यावर बायडन यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये हे बायडन-हॅरिस सरकार असल्याचे म्हणत होते. एकट्या फेब्रुवारी महिन्यात हे दोघेही 38 कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले होते. मात्र, या महिन्यात दोघांना फक्त सात वेळा एकत्र पाहिले गेले आहे. 

बायडेन यांच्या मतांमध्ये सतत घसरण होताना दिसत आहे. काही बातम्यांमध्ये कमला या बायडेन यांच्यावर नाराज असल्याचे म्हटले आहे. बायडेन यांच्या घसरत्या लोकप्रियतेचा परिणाम त्यांच्यावरही होण्याची शक्यता आहे. काही बातम्यांमध्ये हॅरिस यांच्यावर बायडेन यांनी खूप काम सोपविल्याचे म्हटले आहे. यामुळे त्या व्यस्त असल्याचे बोलले जात आहे. अमेरिकेत दिवाळीसाठी एक कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यामध्ये अन्य भारतीय सदस्य सहभागी झाले होते. मात्र, कमला यांना उपस्थित राहता आले नव्हते.

Web Title: America's right wing rife with talk of Joe Biden-Kamala Harris rift

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.