काही आठवड्यांपूर्वी इस्रायलच्या हवाई दलाने बेरूतच्या दिशेने एका ऑपरेशन दरम्यान अमेरिकन बनावटीचा GBU-39 स्मॉल डायमीटर बॉम्ब लॉन्च केला होता. या हल्ल्यात हिजबुल्लाहचा मिलिट्री कमांडर अली तबातबाई मारलागेला होता. मात्र, हा बॉम्ब फुटला नव्हता. आता हा बॉम्ब रशिया अथवा चीनच्या हाती लागण्याची भीती अमेरिकेला वाटू लागली आहे. यामुळे, अमेरिकेने लेबनॉन सरकारकडे तातडीने हा बॉम्ब परत करण्याची विनंती केली आहे. मात्र अमेरिकेच्या या विनंतीवर लबनान सरकारकडून कसल्याही प्रकारची अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
बोईंगने तयार केलेला GBU-39 हा एक 'ग्लाइड बॉम्ब' आहे. एकदा लॉन्च झाल्यानंतर, तो आपले पंख पसरून इंजिन नसतानाही 110 किमी पर्यंत अचूकपणे ग्लाइड करू शकतो. अवघे 110 किलो वजन असलेला हा कॉम्पॅक्ट बॉम्ब त्याच्या विशिष्ट वॉरहेडमुळे कमी वजन असले तरी, मोठे नुकसान करू शकतो. तो कंक्रीटच्या इमारतही भेदू शकतो. जीपीएस (GPS) आणि इनर्शियल गाईडन्स प्रणालीमुळे याची अचूकता 1 मीटर पर्यंत असते.
इस्रायलच्या हवाई दलातील ‘शार्प हेल’! -या बॉम्बचा सर्वप्रथम वापर 2006 मध्ये करण्यात आला आणि हा बॉम्ब F-35 सारख्या अत्याधुनिक विमानांसाठी खास मानला जातो. कारण F-35 याच्या आठ युनिट्स आपल्या अंतर्गत वेपन बेमध्ये घेऊन जाऊ शकते. आजपर्यंत बोईंगने अशा सुमारे 20,000 किट्स तयार केल्या असून त्या केवळ इटली, नीदरलँड्स, ऑस्ट्रेलिया आणि सौदी अरेबियासारख्या निवडक मित्र राष्ट्रांनाच विकल्या आहेत. इस्रायलच्या हवाई दलात हा बॉम्ब ‘शार्प हेल’ या नावाने ओळखला जातो.
Web Summary : America urgently requested Lebanon return an unexploded Israeli bomb fearing Russian or Chinese acquisition. The GBU-39, a precision-guided weapon, poses a security risk. Israel used the bomb in Lebanon, but it didn't detonate, prompting U.S. concern.
Web Summary : अमेरिका ने लेबनान से तत्काल एक इजरायली बम वापस करने का अनुरोध किया, क्योंकि उसे रूसी या चीनी अधिग्रहण का डर है। जीबीयू-39 एक सटीक-निर्देशित हथियार है, जो सुरक्षा जोखिम पैदा करता है। इजरायल ने लेबनान में बम का इस्तेमाल किया, लेकिन वह फटा नहीं, जिससे अमेरिका चिंतित है।