Afghanistan Crisis: पंजशीर लढले, पण अखेर पडले? गव्हर्नर हाऊसवर कब्जा केल्याचा तालिबानचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 09:45 PM2021-09-04T21:45:05+5:302021-09-04T21:45:50+5:30

Afghanistan Crisis: गेल्या काही दिवसांपासून तेथील स्थानिक नेता अहमद मसूद याच्या नेतृत्वाखालील नॅशनल रेजिस्टेंट फ्रंट नॉर्दन अलायन्स तालिबानला कडवी टक्क देत होते. मात्र आता पंजशीरमधील गव्हर्नर हाऊसवर कब्जा केल्याचा दावा केला आहे.

Afghanistan Crisis: Panjshir fought, but finally fell? The Taliban claimed control of the governor's house | Afghanistan Crisis: पंजशीर लढले, पण अखेर पडले? गव्हर्नर हाऊसवर कब्जा केल्याचा तालिबानचा दावा 

Afghanistan Crisis: पंजशीर लढले, पण अखेर पडले? गव्हर्नर हाऊसवर कब्जा केल्याचा तालिबानचा दावा 

googlenewsNext

काबूल - तब्बल २० वर्षांपासून अफगाणिस्तानमध्ये तळ ठोकून असलेले अमेरिकन सैन्य माघारी परतणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर तालिबाननेअफगाणिस्तानच्या एकेका प्रांतावर कब्जा करण्याचा धडाका लावला होता. (Afghanistan Crisis) तसेच अमेरिकन सैन्य माघारी परतण्यापूर्वी १५ दिवस आधीच तालिबानने राजधानी काबूलवर कब्जा केला होता. संपूर्ण देश ताब्यात आला तरी  अफगाणिस्तानमधील पंजशीर प्रांतावर मात्र तालिबानने निशाण फडकले नव्हते. गेल्या काही दिवसांपासून तेथील स्थानिक नेता अहमद मसूद याच्या नेतृत्वाखालील नॅशनल रेजिस्टेंट फ्रंट नॉर्दन अलायन्स तालिबानला कडवी टक्क देत होते. मात्र आता पंजशीरमधील गव्हर्नर हाऊसवर कब्जा केल्याचा दावा केला आहे. (Panjshir fought, but finally fell? The Taliban claimed control of the governor's house)

संपूर्ण अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतरही पंजशीर तालिबानच्या नियंत्रणाबाहेर आहे. त्यामुळे तालिबानने पंजशीरवर कब्जा करण्यासाठी जोरदार आघाडी उघडली होती. तर पंजशीरमधील स्थानिक फौजेकडूनही तिचा कडवा प्रतिकार होत होता. दरम्यान, आज पंजशीर नियंत्रणाखाली आल्याचा दावा तालिबानने केला होता. त्यानंतर आता पंजशीरचे गव्हर्नर हाऊस तालिबानच्या कब्ज्यात आल्याचे तालिबाबने म्हटले आहे. मात्र पंजशीरमधील नॅशनल रेजिस्टंट फ्रंट तालिबानच्या चौफेर हल्ल्यानंतरही चिवट प्रतिकार सुरू ठेवला आहे. तसेच अखेरपर्यंत लढाईची निर्धार कायम ठेवला आहे.

दरम्यान, पंजशीरवर कब्जा केल्याचा दावा तालिबानने एक दिवसापूर्वीही केला होता. मात्र हा दावा पंजशीरमधील नेत्यांनी फेटाळून लावला होता. मात्र तालिबानचे दहशतवादी पंजशीरमधील रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांवर कब्जा करण्यात यशस्वी ठरल्याचे वृत्त आहे. मात्र पंजशीरच्या संपूर्ण परिसरावर त्यांचे नियंत्रण प्रस्थापित झालेले नाही. यादरम्यान, शनिवारीही पंजशीरमध्ये तालिबान आणि पंजशीरच्या विरोधी गटांमध्ये चकमकी झाल्या.

शुक्रवारी काबुलमध्ये तालिबान आपल्या नव्या सरकारची स्थापना करेल, असे वृत्त रॉयटर्सने दिले होते. मात्र तसे काह घडले नाही. त्यानंतर तालिबानच्या प्रवक्त्याने शनिवारी नव्या सरकारची स्थापना होईल, असे सांगितले. मात्र आजही सरकार स्थापन होऊ शकली नाही. आता पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये सरकार स्थापन होईल, असे सांगितले जात आहे.  

Web Title: Afghanistan Crisis: Panjshir fought, but finally fell? The Taliban claimed control of the governor's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.