16 वर्षांच्या पोरीनं घेतला 'बदला'; आई-वडिलांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना ठार मारलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 06:05 PM2020-07-21T18:05:38+5:302020-07-21T18:06:32+5:30

अफगाणिस्तान सरकारला पाठींबा देणाऱ्या तिच्या आई-वडिलांची तालिबानींकडून हत्या करण्यात आली, अन्...

Afghan Girl Kills Two Taliban Fighters After Parents Murdered | 16 वर्षांच्या पोरीनं घेतला 'बदला'; आई-वडिलांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना ठार मारलं!

16 वर्षांच्या पोरीनं घेतला 'बदला'; आई-वडिलांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना ठार मारलं!

Next

घाझ्नी : अफगाणिस्तानात सध्या एका मुलीची जोरदार चर्चा आहे. अफगाणिस्तान सरकारला पाठींबा देणाऱ्या तिच्या आई-वडिलांची तालिबानींकडून हत्या करण्यात आली. तालिबानी सैन्यानं तिच्या डोळ्यादेखत आई-वडिलांना घरातून फरफटत बाहेर नेले आणि गोळ्या घातल्या. त्यानंतर या मुलीनं त्या दोन्ही तालिबानींना गोळ्या घालून ठार केलं आणि अनेक तालिबानींना जखमी केल्याची चर्चा सुरू आहे. 

...त्यापेक्षा हे दूध भुकेल्या मुलांना द्या; भारतीय क्रिकेटपटूचा 'स्वाभिमानी शेतकऱ्यां'ना सल्ला

मागील आठवड्यातील ही घटना आहे. क्वामार गूल असं या मुलीचं नाव आहे. येथील घोर प्रांतात ती कुटुंबीयांसोबत राहत होती. तालिबानी तिच्या वडिलांना शोधत घरापर्यंत आल्याची माहिती, तेथील स्थानिक पोलीस हबीबुराहमन मलेक्झाडा यांनी दिली. त्यांनी सांगितले की,''तिचे वडील सरकारचे समर्थक होते. त्यामुळे तालिबानी त्यांच्या घरी आले आणि त्यांना खेचत घराबाहेर आणले. जेव्हा त्याच्या पत्नीनं प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तालिबानींनी तिलाही घराबाहेर फरफटत आणले आणि दोघांची हत्या केली. त्यानंतर गूलनं घरातील AK-47 हातात घेतली आणि आई-वडिलांची हत्या करणाऱ्यांना पहिल्या गोळ्या झाडल्या. त्यानंतर इतरांना जखमी केलं.''

टीम इंडिया करणार मोटेरा स्टेडियमवर सराव; पण, MS Dhoni ला 'नो एन्ट्री'!

गूलचं वय 14 ते 16 वर्षांचे असेल. त्यानंतर काही तालिबानी तिच्यावर हल्ला करण्यासाठी परतले, परंतु गावकऱ्यांनी आणि सैनिकांनी त्यांना हद्दपार केले. अफगाणिस्तान सुरक्षा रक्षकांनी  गूल आणि तिच्या भावाला सुरक्षित ठिकाणी ठेवले आहे.  ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. हातात बंदूक घेतलेल्या गूलचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिच्या शौर्याचे जगभरात कौतुक होत आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

 

पाकिस्तानला मोठा धक्का; चौथ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह सापडला गोलंदाज 

आशिया चषक, ट्वेंटी-20 वर्ल्ड कप रद्द, तरीही 'IPL 2020'च्या मार्गातील अडथळे कायम! 

Big News : सहा महिन्यांत दोन वेळा रंगणार IPL स्पर्धा; क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर 

सौरव गांगुलीची विनंती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने फेटाळली; टीम इंडियाला करावी लागणार 'ही' गोष्ट!

ICCच्या निर्णयानं 2023मध्ये भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये बदल; 36 वर्षांनी जुळून येईल योगायोग

बेन स्टोक्सचा पराक्रम; 14वर्षानंतर ICC Rankingमध्ये इंग्लंडच्या खेळाडूनं मिळवलं मानाचं स्थान

ICC World Test Championship: इंग्लंडची मोठी झेप; भारत अन् ऑस्ट्रेलियाच्या स्थानाला धोका?

गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी नियम मोडणाऱ्या जोफ्रा आर्चरचा कोरोना रिपोर्ट आला समोर... 

 

 

Web Title: Afghan Girl Kills Two Taliban Fighters After Parents Murdered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.